तिरुवनंतपुरम: भारत आणि विंडीज यांच्यात गुरुवारी पाचवी आणि शेवटची वनडे रंगणार आहे. हा सामना ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानावर हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. याआधी या मैदानावर एक टी20 सामना खेळला गेला आहे. ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर एकाच वेळी 45 हजार लोकं सामना पाहू शकता. 


भारताने जिंकली एकमात्र टी20


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिरुवनंतपुरम येथे खेळवण्यात आलेली एकमात्र टी20 ही भारताने जिंकली होती. भारताने 2017 मध्ये न्यूझीलंडला 6 रनने येथे पराभूत केलं होतं. आठ-आठ ओव्हरच्य़ा झालेल्य़ा या सामन्य़ात भारताने पाच विकेटवर 67 रन केले होते. न्यूझीलंडन फक्त 61 रन करु शकली. या मैदानावर मनीष पांडेने 17 तर कॉलिन डि ग्रँडहोमने सर्वाधिक 17 रन केले आहेत. जसप्रीत बुमराह, टिम साउदी आणि ईश सोढीने या मैदानावर 2-2 विकेट घेतले आहेत. वेस्टइंडिज या मैदानावर पहिला सामना खेळणार आहे.


30 हजार तिकीटांची विक्री 


केरळ क्रिकेट बोर्डाला विश्वास आहे की संपूर्ण तिकीट विकले जातील. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तिकीटावर 50 टक्के सूट देण्यात आली आहे. केसीएच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, 'जवळपास 30 हजार तिकीटांची विक्री झाली असून शेवटच्या दिवसापर्यंत सगळे तिकीटं विकले जातील असा विश्वास आहे. 3 कोटीपेक्षा अधिकची तिकीटं विकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


दोन्ही संघ तिरुवनंतपुरमला पोहोचले 


भारत आणि विंडीजची टीम मंगळवार तिरुवनंतपुरम येथे पोहोचली आहे. गुरुवारी दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर भारत 3-1 ने ही सिरीज देखील आपल्या नावे करेल. विंडीजने दर हा सामना जिंकला तर सिरीज 2-2 ने बरोबरीने सुटेल.