6,6,6,6,4,6,6.. टीम इंडियामध्ये नव्या `शर्मा`ची एन्ट्री, युवराजच्या चेल्यानं रचला इतिहास!
India vs Zimbabwe 2nd T20I : टीम इंडियाचा भावी सुपरस्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने (Abhishek Sharma) झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतक ठोकलं. त्यावेळी त्याने इतिहास देखील रचलाय.
Abhishek Sharma creates history with century : टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेत्या युवराज सिंगचा चेला असलेल्या अभिषेक शर्माने दुसऱ्याच टी-ट्वेंटी सामन्यात इतिहास रचला आहे. अभिषेक शर्माने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या 46 चेंडूत शतक झळकावलं अन् शतक पूर्ण केलं. यामध्ये 8 सिक्स आणि 4 फोरचा समावेश आहे. त्याच्या या वादळी खेळीमुळे यजमानांना घाम फुटला होता.
आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा खेचणाऱ्या अभिषेक शर्माला पहिल्या सामन्यात त्याला खातं देखील खोलता आलं नाही. त्यामुळे आयपीएल हिरोवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तर काहींनी त्याची तुलना धोनीसोबत देखील केली होती. अशातच आता दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने यजमानांना घाम फोडला. अभिषेक शर्माने स्फोटक खेळी करताना 8 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 46 चेंडूत शतक झळकावलं. अभिषेक शर्माने सुरूवात हळूवार केली. त्याने 33 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, पुढच्या 13 बॉलमध्ये अभिषेकने कहर केला. पुढच्या 13 बॉलमध्ये त्याने पुढच्या 50 धावा कुटल्या.
अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरं जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी रोहित शर्माने 35 बॉलमध्ये अशी कामगिरी करून दाखवली होती. तर, सूर्यकुमार यादवने 45 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. अशातच आता अभिषेक शर्मा नवा टी-ट्वेंटी स्टार म्हणून उदयाला येत आहे. केएल राहुलने देखील 46 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती.
भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा,ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): वेस्ली मधेवेरे, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (डब्ल्यू), वेलिंग्टन मसाकादझा, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.