South Africa vs India, 1st ODI : जोहान्सबर्ग येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि आवेश खान या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला आहे. साऊथ अफ्रिकेने टीम इंडियासमोर 116 धावा उभारल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने आरामात विजय नोंदवला आहे. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंग याने 5 विकेट्स आणि साई सुदर्शनने 55 धावा करत चमकदार कामगिरी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथ अफ्रिकेने 117 धावांचं किरकोळ आव्हान टीम इंडियाला दिलं होतं. या सामन्यात नवी ओपनिंग जोडी मैदानात उतरली. ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनी आक्रमक सुरूवात केली. मात्र, ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला. त्याने फक्त 5 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शनने संयम दाखवला अन् सामना खिशात घातला. दोघांनी अर्धशतक झळकावलं. साई सुदर्शनने आपल्या डेब्यू सामन्यात अर्धशतक झळकावून सर्वांच्या नजरा सामावून घेतल्या. विजयाला 5 धावा बाकी असताना श्रेयस बाद झाला. त्यानंतर तिलक वर्माने उरलेलं काम केलं.


टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टन एडन मार्करामला महागात पडला. सलामीवीर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन झटपट बाद झाले. त्यामुळे टोनी डी झॉर्झी याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही अर्शदीपच्या घातक गोलंदाजीसमोर गुडघे टेकवावे लागले. साऊथ अफ्रिकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. मात्र, अँडिले फेहलुकवायो याने 33 धावांची महत्त्वाची खेळी करत साऊथ अफ्रिकेची लाज राखली. त्यानंतर कुलदीप यादवने शेवटची विकेट घेतली अन्  साऊथ अफ्रिकेचा खेळ 116 धावांवर खल्लास केला.



टीम इंडिया : लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.


साऊथ अफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झॉर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी.