टाँटन : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने विजयी घोडदौड कायम राखताना वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजय मिळवलाय. वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवलेले १८४ धावांचे आव्हान भारताने ७ विकेट राखत पूर्ण केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडला पराभवाची धूळ चारल्यानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला लोळवले. सलामीवीर स्मृती मंदनाने जबरदस्त शतकी खेळी केली. 


भारताची कर्णधार मिताली राजचे अर्धशतक चार धावांनी हुकले. पहिले दोन विकेट झटपट गमावल्यानंतर मानधनाने संयमी खेळी करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही मंदनाने ९० धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकताना प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने ५० षटकांत ८ बाद १८३ धावा केल्या.