भुवनेश्वर-धोनीनं भारताला जिंकवलं!
भुवनेश्वर कुमारची हाफ सेंच्युरी आणि त्याला धोनीनं दिलेल्या साथीमुळे भारताचा दुसऱ्या वनडेमध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य झाला आहे.
कोलंबो : भुवनेश्वर कुमारची हाफ सेंच्युरी आणि त्याला धोनीनं दिलेल्या साथीमुळे भारताचा दुसऱ्या वनडेमध्ये अशक्य वाटणारा विजय शक्य झाला आहे. २३१ रन्सचा पाठलाग करताना भारताची अवस्था एकवेळ १३१/७ अशी झाली होती.
शिखर धवन आणि रोहित शर्मानं चांगली सुरुवात दिल्यानंतर २२ रन्समध्ये टीम इंडियाच्या सात विकेट्स पडल्या. रोहित शर्मानं ५४ आणि शिखर धवननं ४९ रन्स करून भारताला १०९ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली पण नंतरच्या बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पण त्यानंतर भुवनेश्वर कुमारनं ८० बॉल्समध्ये नाबाद ५३ रन्स आणि धोनीनं ६८ बॉल्समध्ये नाबाद ४५ रन्स केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.
श्रीलंकेच्या धनंजयानं सहा तर सिरीवर्धनानं एक विकेट घेतली. त्याआधी टीम इंडियानं टॉस जिंकून श्रीलंकेला पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेला २३६ रन्सवर रोखलं. जसप्रीत बुमराहनं ४, चहालनं २ आणि हार्दिक पांड्या, अक्सर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयामुळे भारतानं वनडे सीरिजमध्ये २-०नं आघाडी घेतली आहे.