मुंबई: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजनंतर आता भारतीय महिला संघाच्या कर्णधाराला कोरोनानं गाठलं आहे. क्रिकेट विश्वातील अनेकांना कोरोनाची लागण होत आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय टी 20 महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरमनप्रीत कौरला कोरोनाची लक्षण दिसल्यानं तिची चाचणी करण्यात आली. ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हरमनप्रीतनं नुकत्यात झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत वन डे सामन्यात सहभाग घेतला होता. त्यावेळी दुखापतीमुळे टी 20 सीरिजमध्ये सहभागी होता आलं नाही. 


सध्या हरमनप्रीत कौरनं स्वत:ला होम क्वारंटाइन केलं आहे. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, इरफान पठाण, यूसुफ पठाण आणि  सुब्रमण्यम बद्रीनाथ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्वजण होम क्वारंटाइन असल्याची माहिती मिळाली आहे. 


देशात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. दुसरीकडे IPL तोंडावर आलं आहे. त्यामुळे या स्पर्धांवरही कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी BCCIकडून IPLआधी काही गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाइडलाइन्स खेळाडूंना पाळणं बंधनकारक असणार आहे.