IND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!
India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
IND vs SL 3rd T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्याच खेळल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी (IND vs SL 3rd T20I) मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळला गेला. सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरो होता. अशातच आता तिसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवचं वादळी शतक पहायला मिळालं आणि याच वादळी शतकाच्या जोरावर टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला आहे. तसेच टीम इंडियाने मालिका देखील खिशात घातली. (India won by 91 runs in IND vs SL 3rd T20I marathi sports news)
भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. डोंगराऐवढं आव्हान पार करताना सलामीवर नशाका आणि कुशल मेंडिस झटपट बाद झाले. त्यानंतर फ्रानँडिसला देखील खास कामगिरी करता आली नाही. डि सिल्वा आणि असंका बाद झाल्यानंतर कॅप्टन शनाकाने (Dasun Shanaka) संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि श्रीलंकेने 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय टीम इंडियाच्या खेळाडूंनी यशस्वी करून दाखवला. टीम इंडियाकडून सलामीला ईशान किशन आणि शुभमन गिल उतरला होता. दोघांना सूरूवात चांगली करता आली नाही. कारण ईशान किशन केवळ 1 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर राहूल त्रिपाठी मैदानात उतरला होता. त्रिपाठीने 16 बॉलमध्ये झटपट 35 धावा ठोकल्या आणि तो बाद झाला.
आणखी वाचा - IND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक
त्रिपाठी आऊट झाल्यांतर सूर्यकुमार यादव (surykumar yadav)मैदानात उतरला होता.सूर्याने उतरताच तुफान फटकेबाजी करायला सुरूवात केली होती. त्याने 51 बॉलमध्ये 112 नाबाद धावा ठोकल्या. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. सूर्याच्या या खेळीने टीम इंडियाचा हा स्कोर 200 पार गेला होता.
शेवटी कर्णधार हार्दिक पंड्या आणि दीपक हूडा स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अक्षरनेही तुफान फटकेबाजी केली. त्याने 9 चेंडूत 4 फोर मारून 21 धावा ठोकल्या आहेत. या बळावर टीम इंडियाने 5 विकेट गमावून 228 धावा ठोकल्या आहेत. टीम इंडियाकडून सूर्याने (surykumar yadav)नाबाद 112 सर्वाधिक धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मधूशंकाने 2 , कसून राजीथा आणि वानींदू हसरंगाने प्रत्येकी एक विकेट घेतली होती.