कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने एक डाव ५३ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातलीये. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय गोलंदाजांसमोर चौथ्या दिवशीच श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. रवींद्र जडेजाने ५, हार्दिक पांड्याने दोन विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डाव ३८६ धावांवर संपुष्टात आला. 


सामन्याच्या तिसऱ्या दिवशी कुशल मेंडीस आणि करुणारत्ने यांनी चिवट फलंदाजी करत चांगली धावसंख्या गाठली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या दोन बाद २०९ धावा झाल्या होत्या. चौथ्या दिवशी श्रीलंकेला ८ गड्यांच्या मोबदल्यात  धावा करता आल्या.


तत्पूर्वी, भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ९ बाद ६२२वर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव १८३ धावांवर गुंडाळण्यात यश आल्याने त्यांच्यावर फॉलोऑन लादण्यात आला. दुसऱ्या डावात श्रीलंकेचा डाव ३८६ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी शतके ठोकली तर रवींद्र जडेजा, वृद्धिमन साहा आणि आर. अश्विन यांनी अर्धशतके ठोकली होती.