जकार्ता : भारताची एक नंबर महिला बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने (PV Sindhu)  विजयी घोडदौड सुरू ठेवत इंडोनेशिया ओपन बँडमिंटम (Indonesia Open 2019) चँम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये स्वत: ची जागा निश्चित केली आहे. पाचवे स्थानावर असलेल्या सिंधूने गुरूवारी झालेल्या महिला एकेरी दुसऱ्या दौऱ्यात, डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डट  (Mia Blichfeldt) चा पराभव केला. सिंधूने हा सामना २१-१४, १७- २१, २१-११ ने जिंकला. सिंधुने १ तास आणि २ मिनटांपर्यंत झालेल्या या सामन्याला जिंकून तिची जागा क्वार्टर फायनलमध्ये नक्की केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरूष जोडीच्या सामन्यात भारताचे सात्विसाइराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीला अपयश मिळाले. त्यांना इंडोनेशियाच्या पहिले प्राधान्य मिळालेल्या जोडीने पराजित केले.  इंडोनेशियाच्या मार्कस फर्नाल्डी गिडॉ आणि केविन संजय सुकामुल्लोच्या जोडीने भारतीय जोडीला २८ मिनिटे चालेल्या सामन्यात २१-१५, २१-१४ पराभव केले.
या आधी, सिंधुने बुधवारी जपानच्या आयो ओहोरीचा पराभव करत प्री. क्वार्टर फायनलमध्ये जागा मिळवली होती. रियो ओलंपिकची रौप्य पदक विजेता सिंधु जवळ-जवळ एक तासापर्यंत चालत असलेल्या या सामन्यात ११-२१, २१- १५, २१-१५ ने विजयी झाली होती. 


बुधवारीच झालेल्या पुरूष एकेरी वर्गात नंबर-९ श्रीकांत याने जपानमध्ये केंटा निशिमोटाचा पराभव करूण, दुसऱ्या दौऱ्यात स्वत: चे स्थान मिळवले. श्रीकांतने त्याच्या सामन्यात २१-१४, २१- १३ ने विजय मिळवला.