वेलिंग्टन : वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर टीम इंडियांच्या फलंदाजांना चांगलाच संघर्ष करावा लागतोय. अवघ्या 100 धावांमध्ये भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी झटपट माघारी परतले. न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर कायले जॅमिन्सननं भारताच्या डावाला खिंडार पाडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्यूझीलंड य़ांच्यातील पहिला टेस्ट सामना आजपासून सुरु झाला आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने 5 विकेट गमवत 122 रन केले आहेत. अजिंक्य रहाणे (38 रन) आणि ऋषभ पंत (10 रन) वर खेळतो आहे.


न्यूझीलंडच्या बॉलर्सने भारतीय टीमवर दबाव कायम ठेवला आहे. साउदी, बोल्ट आणि जैमिसनने भारतीय फलंदाजांना जास्त वेळ क्रीजवर टिकण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे बॉलर्सपुढे फलंदाजांचा संघर्ष पाहायला मिळाला. कर्णधार विराट कोहली आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोर 40 रनवर 3 विकेट होता.


भारतीय टीम : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन.


न्यूजीलंड टीम : केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, काइल जैमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोल्स, ऐजाज पटेल, टिम साउदी, रॉस टेलर, बीजे वॉटलिंग.