Shahid Afridi Controversial Statement: सध्या वर्ल्डकप सुरु असून टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi ) मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दरम्यान शाहीद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या ( Shahid Afridi ) म्हणण्यानुसार, भारतीय संघ आता मांसाहार करू लागला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता चांगले गोलंदाज आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज भारतीय टीममध्ये आले आहेत. जसं की, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग. या सर्व गोलंदाजांनी त्यांच्या चमकदार कामगिरीने जगभरात आपलं नाव कमावलं आहे.


पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi ) म्हणाला, "भारताची लोकसंख्या 140 कोटी इतकी आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या क्वालिटीमध्ये जो बदल झालाय तो विलक्षण आहे. पूर्वी आम्ही म्हणायचो की, त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तानातून चांगले गोलंदाज येत असतात. पण असं नव्हते, कारण आमचे गोलंदाज आणि फलंदाज दोघेही चांगले असायचे. मात्र, आता त्यांच्या गोलंदाजांनी मांसाहार करण्यास सुरुवात केली असून त्यांची ताकद वाढली आहे.


दरम्यान शाहिद आफ्रिदीचं ( Shahid Afridi ) हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे. यावरून लोकांनी विविध चर्चा करण्यास सुरुवात केलीये. 


शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi ) पुढे म्हणाला की, सौरव गांगुलीने कर्णधार असताना त्यांनी खूप बदल केले. मग एमएस धोनीने ज्या प्रकारे सर्व वरिष्ठांना सोबत ठेवले ते कौतुकास्पद आहे. बीसीसीआयनेही अनेक योग्य पावलं उचलली. आयपीएलसारख्या स्पर्धांचे आयोजन करून त्यामध्ये देशांतर्गत क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते.


राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूकडे बीसीसीआयने संपूर्ण देशांतर्गत क्रिकेटची जबाबदारी देण्यात आली होती. क्रिकेटपटूंना कसं तयार करायचं हे त्यांना माहीत आहे. यामुळेच आता भारताच्या 2 टीम तयार करत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे यापूर्वी एनसीएची जबाबदारी होती अशी माहिती आहे, असंही शाहिदचं म्हणणं आहे.