मुंबई : भारतीय बॉक्सिंग स्टार विजेंदर सिंहनं चीनचा बॉक्सर मैमतअली याला एका रोमांचकारी सामन्यात पछाडत एकसाथ दोन किताब आपल्या नावावर केलेत. उल्लेखनीय म्हणजे, विजेंदरनं भारत - चीन सीमेवर शांतता नांदण्यासाठी आपले हे पुरस्कार समर्पित केलेत. मी हे पुरस्कार चीनचा बॉक्सर मैमतअलीला देतो, असं म्हणत विजेंदरनं शांतीचा संदेश दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजेंदर सिंहचा सामना चीनचा नंबर वन बॉक्सर जुल्फिकार मैमतअलीसोबत झाला. विजेंदरनं चीनी प्रतिस्पर्धी मैमतअलीचा पराभव करत डब्ल्युबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट खिताब आपल्या नावावर केलाय. याचसोबत त्यानं डब्ल्युबीओ ओरिएन्टल सुपर मिडलवेट खिताबही जिंकलाय... त्यामुळे विजेत्यांच्या चाहत्यांसाठी हा डबल धमाका ठरला. बीजिंग ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता विजेंदरच्या प्रोफेशनल करिअरमध्ये हा सलग नववा विजय ठरला. मुंबईमध्ये हा सामना पार पडला.


भारत - चीन सीमारेषेवरचा उल्लेख करत 'मला चीनला फक्त इतकंच सांगायचंय की आमच्या सीमारेषेत घुसू नाक. हे शांतिसाठी आहे... आणि हा तणाव आम्हाला विचलीत करतो. मैमतअली खूप चांगला खेळाडू आहे... मी हा पुरस्कार मैमतअलीला परत करतो... हा शांतिसाठी एक संदेश आहे' असं म्हणत विजेंदरनं शांतिसंदेशही दिलाय. 


बॅटलग्राऊंड एशिया नावानं होणाऱ्या या सामन्यात भारताच्या अखिल कुमार आणि जितेंदर कुमारनं आपला प्रो-बॉक्सिंग डेब्यु केला. विजेंदरनं या सामन्याचं पहिलं तिकीट क्रिकेटर सचिन तेंडुलकरला त्याच्या निवासस्थानी जाऊन दिलं होतं.