नवी दिल्ली : 9 हजारहून अधिक धावा करणाऱ्या स्टार क्रिकेटपटूनं एक धक्कादायक किस्सा सांगितला. त्यासोबत ट्वीट करून त्याने मॅच फिक्सिंगचा बॉम्बही फोडला. यामध्ये भारताचं कनेक्शन असल्याचा दावाही त्याने केला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर क्रीडा विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ब्रेंडन टेलरने फिक्सिंगचा बॉम्ब फोडून मोठा धक्का दिला आहे. 9,863 धावा करणारा फलंदाज ब्रेंडन टेलरने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करून धक्कादायक खुलासा केला. या खुलाशानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ब्रेंडन टेलरवरही बंदी लावू शकतात. 


ब्रेंडन टेलरने केलेल्या दाव्यानुसार एका भारतीय व्यावसायिकाने त्याचा ड्रग्स आणि कोकेन घेतानाचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ त्याच्याकडे आहे. त्याचा वापर तो मला ब्लॅकमेल करण्यासाठी करत आहे. स्पॉट फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल करण्यासाठी त्या व्यावसायिकाने या व्हिडीओचा वापर केला. इतकच नाही तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. 


ब्रेंडन टेलरच्या मते मात्र त्याने त्या फिक्सरचे कधीही ऐकले नाही. सर्व सामने प्रामाणिकपणे खेळले. हे प्रकरण ऑक्टोबर 2019 चे आहे, जेव्हा ब्रेंडन टेलर झिम्बाब्वेमध्ये प्रायोजकत्व करार आणि T20 स्पर्धेवर चर्चा करण्यासाठी भारतात आला होता.


ब्रेंडनने केलेल्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. त्याने केलेल्या दाव्यानुसार व्यावसायिकाने त्याला कोकेनं घेण्यासाठी जबरदस्ती केली. या सगळ्या प्रकरणामुळे त्याला मानसिक त्रास झाल्याचंही ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. 



या सगळ्या प्रकरणानंतर आता ICC या क्रिकेटपटूवर बंदी लावू शकते. या प्रकरणाची आता चौकशी होणार का? या क्रिकेटपटूनं केलेल्या दाव्यात तथ्य असेल का? असे अनेक प्रश्न आता समोर आहेत. सध्या आयसीसीकडून याबाबत कोणतंही पाऊल उचलण्यात आलं नाही. त्यामुळे ICC काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.