Virat Kohli Instagram: भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) मैदानावर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसरा भारतीय क्रिकेटर असे अनेक रेकॉर्ड त्याच्या नवावर आहेत. पण मैदानावर रेकॉर्ड ब्रेक करणारा विराट मैदानाबाहेरही रेकॉर्ड करत खळबळ उडवून दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तिआनो रोनाल्डो (Cristiano Ronaldo), लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि नेयमार (Neymar) यांच्यानंतर सर्वात महागडा आणि सर्वाधिक फॉलोअर्स असलेला विराट कोहली हा चौथा खेळाडू आहे. विराट कोहली इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करण्यासाठी तब्बल 8 कोटी रुपये घेतो. विराट कोहलीनंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी सर्वाधिक पैसे घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत मिस वर्ल्ड प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) नंबर लागतो. प्रियंका चोप्रा एका पोस्टसाठी 3.5 कोटी रुपये घेते.


इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विराट कोहली 14 व्या क्रमांकावर आहे. टॉप पंधरामध्ये विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे. प्रियंका चोप्रा या यादीत 27 व्या क्रमांकावर आहे.


विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड
विराट कोहली क्रिकेटबरोबरच सोशल मीडियावरही (Social Media) नेहमीच चर्चेत असतो. आता सोशल मीडियावरही त्याच्या नावे मोठा रेकॉर्ड जमा झाला आहे. विराट कोहलीच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सची (Twitter Account Followers) संख्या तब्बल 50 मिलिअन (50 Millions) इतकी झाली आहे. विराट कोहली जगातला पहिला क्रिकेटपटू आहे ज्याची फॉलोअर्स संख्या 50 मिलिअन आहे. याबरोबरच विराट कोहलीचं ट्विटर अकाऊंट सर्वात जास्त फॉलोअर्स असलेलं भारतातलं तिसरं अकाऊंट बनलं आहे. पहिल्या दोनमध्ये पीएओ ऑफिशियल ट्विटर अकाऊंट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं ट्विटर अकाऊंट आहे. 


इंस्टाग्रामवरही रेकॉर्ड
विराट कोहली इन्स्टाग्रामवरही (Instagram) किंग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे तब्बल 211 मिलिअनहून अधिक फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर 200 मिलिअन फॉलोअर्स असणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. विराटच्या आसपासही इतके मिलिअन असणारा एकही भारतीय नाही. गेल्या वर्षीच विराटने 100 मिलिअनचा आकडा पार केला होता.