IND vs AFG, Rohit Sharma : एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 9 वा सामना भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 80 धावांची खेळी केली. तर भारताकडून बुमराहने एकूण 4 विकेट घेतल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 8 विकेट्सने विजय मिळवता आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानने दिलेल्या 273 धावांचं आव्हान पार करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजीला आले. रोहितने एका बाजुने हाणामारी सुरू केली. तर इशान किशन फक्त स्टाईक देण्याचं काम करत होता. रोहित शर्माने 63 बॉलमध्ये खणखणीत शतक ठोकलं. त्यावेळी त्याने अनेक रेकॉर्ड मोडले. 47 धावा करून इशान किशन बाद झाल्यानंतर रोहितचा खेळ स्लो झाला. रोहित 131 धावा करून बाद धाला. या खेळीत त्याने 16 फोर अन् 5 गगनचुंबी षटकार खेचले. त्यानंतर विराट कोहली अन् श्रेयस अय्यरने खेळ सांभाळला. विराट कोहलीने 55 धावांची खेळी केली.



प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरूवातच खराब झाली. अफगाणिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरपर्यंत 3 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या फक्त 63 धावा होत्या. त्यावेळी हशमतुल्लाह शाहीदी आणि अजमातुल्ला उमरझाई यांनी डाव सांभाळला अन् 100 धावांची पार्टनरशिप पूर्ण केली. कॅप्टन हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची मोठी खेळी केली. तर अजमतुल्ला उमरझाई याने 62 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे अफगाणिस्तानला 50 ओव्हरमध्ये 272 धावा करता आल्या. 


आणखी वाचा - विराटशी पंगा पण रोहितने घेतला बदला, नवीन उल हकला दाखवल्या रात्रीच्या चांदण्या; पाहा Video


अफगाणिस्तान : हशमतुल्लाह शाहीदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.