Team India | टीम इंडियाला भेटले 2 स्टार खेळाडू, रोहितला पुजारा-रहाणे आठवणारही नाहीत
टीम इंडिया (Team India) कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात धमाकेदार कामगिरी करतेय. रोहित नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतोय.
मुंबई : टीम इंडिया (Team India) कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात धमाकेदार कामगिरी करतेय. रोहित नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देतोय. हे खेळाडूही अपेक्षित कामगिरी करतायेत. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाला तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी स्टार खेळाडू भेटले आहेत, ज्यामुळे कॅप्टन रोहितला अंजिक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराची (Cheteshwar Pujara) उणीव भासणार नाही. (indian cricket team captain rohit sharma hanuma vihari and shreyas iyer replacement of cheteshwar pujara and ajinkya rahane)
रहाणेच्या जागी या खेळाडूला संधी
श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहितने श्रेयस अय्यरला (Shreys Iyer) पाचव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं. अय्यरने या क्रमांकावर दमदार कामगिरी करत दावेदारी सिद्ध केली. अय्यरने पहिल्या टेस्टमध्ये 27, दुसऱ्या कसोटीत 92 आणि 67 धावा केल्या.
श्रेयस दोन्ही डावात अर्धशतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. त्याला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. अय्यरने टेस्ट डेब्यूत शतक ठोकलं होतं.अय्यरला आयपीएलमध्ये कोलकाता टीमचं कर्णधारपद देण्यात आलंय. अय्यरमध्ये सामन्याचा निकाल एकहाती पालटण्याची क्षमता आहे.
तिसऱ्या क्रमांकासाठी पुजारापेक्षा घातक फलंदाज
हनुमा विहारी गेल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करतोय. विहारीने 2018 मध्ये टीम इंडियाकडून कसोटी पदार्पण केलं होतं. विहारीने आतापर्यंत टीम इंडियाकडून 12 कसोंटीमध्ये पदार्पण केलंय. यामध्ये त्याने 1 शतकासह 624 धावा केल्या आहेत.
विहारीत मधल्या फळीत खेळण्याची क्षमता आहे. विहारीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी सामन्यात मैदानात घट्ट पाय रोवून सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली होती. विहारीने आपल्या कामगिरीने स्वत:चं महत्तव सिद्ध केलं होतं.
रोहितने श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत विहारीला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलं होतं. हनुमाने रोहितचा विश्वास सार्थ ठरवला. विहारीने पहिल्या कसोटीत शानदार फिफ्टी ठोकली.