भारतीय संघ आज श्रीलंकेविरोधातील (Ind vs SL) पहिला टी-20 (T-20) सामना खेळणार आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर होणारी ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे भारतीय संघ नेमकी कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष आहे. गौतम गंभीर आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमारची निवड केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टी-20 सामन्याआधी सूर्यकुमार यादवसह सर्व खेळाडूंनी मैदानात सराव केला. दरम्यान यावेळी एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेटमध्ये चक्क फिरकी गोलंदाजी टाकत होता. 


विशेष म्हणजे हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीची स्टाईल हुबेहूब भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेसारखी होती. ही अॅक्शन पाहिल्यानंतर चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. याशिवाय कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. 


गंभीरची दृढता तसेच त्याचा तीव्र दृष्टिकोन त्याला खेळाडूंसाठी काम करण्यासाठी एक वेगळा प्रशिक्षक बनवेल, ज्यांना नवीन T20I कर्णधार सूर्यकुमारचे मार्ग देखील शिकावे लागतील. गौतम गंभीरचा वेगळा दृष्टीकोन संघासाठी मदतशीर ठरेल अशी आशा आहे. तसंच त्याला नवख्या खेळाडूंसह अनेक नव्या गोष्टीही आत्मसात कराव्या लागणार आहेत. 


कर्णधारपदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादवने हार्दिक पांड्याला मागे टाकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. निवडकर्त्यांनीही कर्णधार म्हणून त्याच्या तुलनात्मक अनुभवाच्या अभावाकडे दुर्लक्ष केले. अजित आगरकरसह निवडकर्त्यांनीही आपण ड्रेसिंग रुममधील फिडबॅकच्या आधारे हा निर्णय घेतला नसून, संघासाठी पूर्णवेळ उपलब्ध असेल असा कर्णधार हवा असल्याचं सांगितलं. 


दुसरीकडे श्रीलंकेने दोन अनुभवी गोलंदाज दुष्मंथा चमीरा (ब्राँकायटिस आणि श्वसन संक्रमण) आणि नुवान तुषारा (तुटलेले बोट) यांना वगळलं असल्याने संघाता उदासनिता असू शकते. यजमानांनी असिथा फर्नांडो आणि दिलशान मदुशंका यांना बदली खेळाजू म्हणून समाविष्ट केले आहे, ज्यांनी शेवटच्या वेळी भारत आणि श्रीलंका वनडे विश्वचषक स्पर्धेत पाच विकेट्स घेतल्या आहेत.