मुंबई : टीम इंडियात (Indian Cricket Team) मोठी खांदेपालट झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्माला (Rohit Sharma) टी 20 नंतर टीम इंडियाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी दिली आहे. वनडे आणि टी 20 या दोन्ही प्रकारात एकच खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी असावी, अशी इच्छा ही निवड समितीची होती. याबाबतची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली. (indian cricket team odi and t 20 team captain hitman rohit sharma salary)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान आता रोहितला वनडे कर्णधार केल्यानतंर त्याच्या मानधनात वाढ होणार का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. तर खरंच वाढ होणार का याबाबत आपण जाणून घेऊयात. 


रोहितला किती पगार मिळणार?  


पद वाढलं की त्यासह जबाबदारी वाढते आणि पगारही. मात्र याला क्रिकेट अपवाद आहे. रोहितला कर्णधारपद मिळाल्याने त्याच्या मानधनात कोणतीच वाढ होणार नाहीये. बीसीसीआय वार्षिक करारानुसार रोहितला 7 कोटी रुपये वेतन देते. 


रोहित हा ए प्लस श्रेणीतील खेळाडू आहे. रोहितला मिळणारं वेतन हे सर्वाधिक आहे. त्यामुळे रोहितला कर्णधारपद मिळाल्याने त्याच्या वेतनात कोणतीच वाढ होणार नाही.


खेळाडूंचा असा ठरतो पगार 


बीसीसीआय दरवर्षी ठराविक कालावधीसाठी खेळाडूंसोबतचा करार जाहीर करते. 


बीसीसीआय या करारानुसार संबंधित खेळाडूंच्या कामगिरीनुसार एकूण 4 टप्प्यात त्यांची वर्गवारी करते. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी असे चार गट असतात. या गटानुसार त्या खेळाडूंचं मानधन ठरतं. यामध्ये ए प्लस गटातील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. 


ए गटातील खेळाडूंना 5 कोटी रुपये मिळतात. तर बी आणि सी गटातील खेळाडूंना अनुक्रमे 3 आणि 1 कोटी रुपये मिळतात. यामध्ये कर्णधार आणि उपकर्णधार या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूंना विशेष मानधन मिळत नाही. वार्षिक करारानुसार ठरलेल्या रक्कमेव्यतिरिक्त अधिक रक्कम मिळत नाही. 


रोहितची कर्णधार म्हणून कामगिरी


रोहितने पूर्णवेळ कर्णधार होण्याआधी विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा सांभाळली आहे. रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा मोजकाच पण पुरेसा अनुभव आहे. 


रोहितने आतापर्यंत 10 वनडे सामन्यात कर्णधारपदाची भूमिका पार पाडली आहे. या 10 वनडे सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर 22 टी 20 सामन्यांपैकी 18 सामन्यात रोहितने प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवलाय.  


दरम्यान आता रोहित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पूर्णवेळ कर्णधारपदाचा श्रीगणेशा करणार आहे. 


दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात ही 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर वनडे सीरिज पार पडणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3 3 सामने खेळवण्यात येणार आहे.


रोहित यापुढे कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. यामुळे आता रोहित आफ्रिकेविरुद्ध कर्णधार आणि उपकर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.  


कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज.


राखीव खेळाडू- नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर आणि अरजान नगवासवाला.


आफ्रिकन टीम 


डीन एल्गर (कर्णधार), टेम्बा बावुमा (उपकर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कगिसो रबाडा, सारेल एरवी, ब्यूरन हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, एडन मार्कराम, विआन मुल्डर, एनरिक नॉर्तजे, कीगन पीटरसन, रॅसी व्हॅन डुर डुसेन, कायल वेरेन, मार्को जॅन्सन, ग्लेंटन स्टुअरमन, प्रिनेलन सुब्रेन, सिसांडा मॅगाला, रायन रिकेल्टन आणि डुआन ऑलिव्हियर. 


कसोटी मालिका 


पहिला सामना, 26-30 डिसेंबर,  सुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियन.  


दुसरा सामना, 3-7 जानेवारी 2022, इम्पीरियल वांडरर्स, जोहान्सबर्ग.  
  
तिसरा सामना,  11-15 जानेवारी 2022,  केपटाऊन.  


वनडे सीरिज 


पहिली वनडे, 19 जानेवारी 2022, पार्ल.


दुसरी वनडे, 21 जानेवारी 2022, पार्ल.


तिसरी वनडे, 23 जानेवारी 2022,  केपटाऊन.