Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन
अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण...
Syed Mushtaq Ali T20: भारतीय क्रिकेट संघात आजवर अनेकदा नव्या जोमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. आता या यादीत एक नवं नाव जोडलं जाण्याची चिन्हं आहेत. गेल्या काही काळापासून संघातील खेळाडू पाहता रोहित शर्मानं कर्णधारपद सांभाळल्यापासून अनेक नव्या खेळाडूंची वर्णी Team India मध्ये लागली आहे. याच भारताच्या क्रिकेट संघात आता एक नवी एन्ट्री होणार का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे सध्या सुरु असणारी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी (Syed Mushtaq Ali T20 Trophy).
अवघ्या 19 वर्षांच्या एका खेळाडूनं या स्पर्धेमध्ये निवड समितीपासून संघातील खेळाडूंचंही लक्ष वेधलं आहे. तुम्ही IPL मध्ये या खेळाडला पाहिलंय. त्याचं नाव आहे, यश ढुल (Yash Dhull).
भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या कर्णधार यश ढुल यानं सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी मध्ये धुमाकूळ घातला आहे. रविवारी, 16 ऑक्टोबर रोजी पुद्दुचेरी आणि दिल्लीमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात यशनं दमदार खेळाचं प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.
अधिक वाचा : एक Replacment रोहित शर्माला जिंकवून देणार T-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी?
47 चेंडूंमध्ये त्यानं 71 धावांची वादळी खेळी खेळत मैदान गाजवलं. या सामन्यात पुद्दुचेरीनं पहिली फलंदाजी करत 8 गडी बाद 168 धावा केल्या होत्या. दिल्लीनं हे लक्ष्य 3 गडी गमावत 19.2 षटकांमध्येच गाठलं.
First Class क्रिकेटमध्ये 4 शतकं...
फार कमी सामन्यांमध्ये यशनं त्याची क्रिकेटवरील पकड सिद्ध केली. अंडर-19 वर्ल्ड कपपासूनच त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. यशनं वर्ल्डकपदरम्यान 4 सामन्यांत सरासरी 76 नं 229 धावा केल्या होत्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यानं आतापर्यंत 6 सामने खेळले. ज्यामध्ये 87.00 च्या सरासरी रन रेटमध्ये त्यानं 783 धावा केल्या. यादरम्यान त्यानं 4 शतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं. थोडक्यात यशच्या हाती बॅट नाही, तर रनमशिन आहे असं म्हणणं वावगं नाही.
अधिक वाचा : क्रिकेटरचे असिस्टंटसोबतचे खाजगी फोटो लीक, पत्नीसोबत घटस्फोटासाठी मोजावे लागले होते 300 कोटी
यशची आयपीएलमधील (IPL) कामगिरी...
IPL लिलावादरम्यान यशला दिल्लीच्या संघानं 50 लाख रुपयांची बोली लावत खरेदी केलं होतं. त्याच्या नावावरून संघांमध्ये खरेदी करण्यासाठी फारसा उत्साह दिसला नाही. दिल्ली आणि पंजाब वगळता इतर कोणत्याही संघानं त्याच्यावर बोली लावली नव्हती. पण, शेवटी खेळाच्याच बळावर त्यानं आपली दखल घेण्यास सर्वांनाच भाग पाडलं. आता मुद्दा असा, की भारतीय संघात जिथं नव्या जोमाच्या खेळाडूंना जागा दिली जात आहे तिथे या स्टार खेळाडूची वर्णी लागणार का?