मुंबई: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. कोरोनामुळे IPL 2021चे 31 सामने स्थगित करण्यात आले होते. भुवनेश्वर कुमारने आपला आधारस्तंभ असलेल्या वडिलांना कोरोनामुळे गमवलं आहे. त्यापाठोपाठ भारतीय संघातील कसोटी सामन्यातील आणखी एका खेळाडूनं आपल्या जीवाभावाची व्यक्ती कोरोनामुळे गमवाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघातील खेळाडू अभिनव मुकुंद याने आपल्या आजोबांना कोरोनामुळे गमावलं आहे. अभिनवच्या आजोबांचं कोरोनामुळे निधन झालं. त्याने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 


'कोरोनामुळे मी माझ्या आजोबांना गमावलं आहे. हे आपल्यासोबत शेअर करताना खूप दु:ख होत आहे. त्यांचं वय 95 वर्ष होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते.'



अभिनव मुकुंद याने टीम इंडियामधून 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 320 धावा केल्या आहेत. तर अर्धशतक देखील केलं आहेत.


Milkha Singh Corona | 'फ्लाइंग शिख' मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण


याआधी स्पिनर पीयूष चावला, भुवनेश्वर कुमार, चेतन साकरिया या खेळाडूंच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. तर दुसरीकडे युजवेंद्र चहलच्या कुटुंबात कोरोना शिरला आहे. आर अश्विनचं कुटुंब देखील कोरोनाशी झुंज देत आहे.