मुंबई : 'फ्लाइंग शिख' अशी जगभर ख्याती असलेले प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनाची लागण (Mikha Singh Tested Covid Positive) झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला चंडीगढ येथील राहत्या घरी क्वारंटाईन केलं आहे. सुदैवाने त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. (indian former sprinter Milkha Singh tested corona positive)
Former Indian sprinter Milkha Singh tested positive for #COVID19. He is in isolation at his home in Chandigarh, confirms his son
(File photo) pic.twitter.com/6DnJEiBLjQ
— ANI (@ANI) May 20, 2021
"आमच्या घरातील हेल्परना कोरोनाची बाधा झाली होती. यानंतर खबरदारी म्हणून आम्ही सर्व कुटुंबियांनी कोरोना चाचणी केली. कुटुंबियांपैकी फक्त माझाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी हैराण आहे. मी पूर्णपणे ठणठणीत आहे. मला कोणतेही लक्षणं नाही. डॉक्टरांनी मला 3-4 दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे", अशी माहिती स्वत: मिल्खा सिंग यांनी दिली.
5 वेळा एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे मिल्खा सिंग 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर राहिले होते. मिल्खा यांचा मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंग दुबईत आहे. तो या आठवड्यात भारतात परतणार आहे.