मुंबई : मैदानाबाहेर संघातील इतर 'वडील' खेळाडूंकडून मिळालेले धडे आता उपयोगात येतील, असं लिहित आयपीएलमधील चेन्नईच्या संघानं ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूला शुभेच्छा दिल्या. निमित्त ठरलं ते म्हणजे या खेळाडूला खासगी जीवनात मिळालेली बढती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांच्या रुपात बढती मिळालेला हा खेळाडू आहे अंबाती रायडू. भारतीय संघातील फलंदाज अंबाती रायुडू आणि त्याची पत्नी चेन्नूपल्ली विद्या यांना रविवारी कन्यारत्न झालं. ज्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळताच संघातील खेळाडू आणि क्रीडारसिकांनी रायुडूसह त्याच्या पत्नीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. सोबतच अतिशय आनंदात त्याच्या लेकीचं स्वागतही केलं. 



क्रिकेटपटू सुरेश रैना यानं रायुडू आणि त्याच्या पत्नीला शुभेच्छा देत लिहिलं, 'मुलीच्या जन्माबद्दल तुम्ही दोघांनाही मनापासून शुभेच्छा. हे एक वरदानच आहे. तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण साजरा करा. तुमच्या आनंदासाठीच मी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो'. 



 


रैनाच्या या शुभेच्छांचे रायुडूनंही आभार मानले. २००९ मध्ये अंबाती रायडू यानं त्याची प्रेयसी चेन्नूपल्ली विद्या हिच्याशी लग्न केलं होतं. नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यानं 'फर्स्ट क्लास' क्रिकेटला अलविदा केलं होतं.