मुंबई : क्रिकेटमध्ये नेहमी गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांच्या अधिक रेकॉर्ड बनलेत. विशेषकरुन जेव्हा टी-२० फॉरमॅट क्रिकेटमध्ये आला तेव्हा गोलंदाजांची हालत अधिकच खराब झाली. मात्र जगात आजही असे काही अव्वल गोलंदाज आहेत ज्यांनी फलंदाजावर आपला वचक कायम ठेवलाय.


जगातील सर्वात कंजूस भारतीय गोलंदाज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघात भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह आल्याने संघाला वेगळी ओळख मिळालीये. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा फलंदाजाबद्दल सांगणार आहोत ज्याने तब्बल २१ मेडन ओव्हर टाकत नवा रेकॉर्ड बनवला. हा रेकॉर्ड आजही इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला गेलाय. क्वचितच भविष्यात कोणी हा रेकॉर्ड तोडू शकेल.


इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केला वर्ल्ड रेकॉर्ड


१९६४मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४५७ धावांची खेळी केली. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडची सुरुवात धीमी झाली. 


दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत इंग्लंडने दोन विकेट गमावताना ६३ धावा केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. भारताकडून पहिल्यांदा बापू नाडकर्णी यांनी गोलंदाजीचा भार स्वीकारला. इंग्लंडने तिसऱ्या दिवशी २ बाद ६३वरुन खेळण्यास सुरुवात केली. मात्र बराच वेळ त्यांच्या खात्यात एकही धाव नव्हती. याचे कारण होते नाडकर्णी. 


त्यानंतर इंग्लंडची तिसरी विकेट ११६वर पडली. मात्र यादरम्यान नाडकर्णी यांनी सलग २१ मेडन ओव्हर टाकत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. बापू नाडकर्णी यांनी या सामन्यात एकूण २९ ओव्हर टाकल्या. यात २६ मेडन्सह तीन धावा दिल्या. यादरम्यान त्यांना एकही विकेट घेण्यात यश मिळाले नाही.