Barinder Sran Announced Retirement : भारतीय क्रिकेटर बरिंदर सरां ने 31 व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.  सरां ने जानेवारी 2016 ते जून 2016 दरम्यान भारतासाठी 6 वनडे आणि 2 टी 20 सामने खेळले, परंतु यानंतर त्याला टीम इंडियात पुन्हा संधी मिळाली नाही. तसेच आयपीएलमध्ये सुद्धा सरां ला खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही, अखेर त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


इंस्टाग्रामवर पोस्ट  लिहून केली निवृत्तीची घोषणा : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरिंदर सरांने शुक्रवारी पोस्ट लिहत म्हंटले, "आता मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे, मी माझ्या प्रवासाकडे कृतज्ञतेने पाहतोय.  2009 मध्ये बॉक्सिंगमधून क्रिकेटमध्ये आल्यानंतर या खेळाने मला असंख्य आणि अविश्वसनीय अनुभव दिले आहेत. वेगवान गोलंदाजी ही माझयासाठी भाग्यशाली ठरली आणि प्रतिष्ठित IPL फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करण्याचा मार्ग सुद्धा खुला झाला. ज्यामुळे 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सर्वोच्च सन्मान मला मिळाला. जरी माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द लहान असली तरी त्याच्या आठवणी मी कायम जपत राहीन. माझ्या संपूर्ण प्रवासात मला योग्य प्रशिक्षक आणि व्यवस्थापनाने साथ दिल्याबद्दल मी देवाचा सदैव आभारी राहीन" .



कोण आहे बरिंदर सरां? 


बरिंदर सरां हा शेतकऱ्याचा मुलगा असून किंग्स 11 पंजाब या आयपीएल टीमची जाहिरात पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ज्यात युवकांना ट्रायलमध्ये भाग घेण्यासाठी बोलावले होते. यापूर्वी हरियाणाच्या भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये बरिंदर सरां हा बॉक्सर म्हणून प्रशिक्षण घेत होता. 2015 च्या आयपीएलमध्ये  राजस्थान रॉयल्सने त्याला लिलावात विकत घेतले. २०१६ मध्ये बरिंदर सरां याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सिरीजसाठी टीम इंडियात निवडण्यात आले. यापूर्वी त्याला केवळ आठ लिस्ट ए सामन्यांचा अनुभव होता. 12 जानेवारी रोजी पर्थमध्ये धोनीच्या नेतृत्वात बरिंदर सरांचा डेब्यू झाला आणि यावेळी त्याने 56 धावा देऊन 3 विकेट घेतले होते. 


जून 2016 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध बरिंदर सरां चे टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात त्याने 10 धावा देत 4  विकेट्स घेतल्या. यापूर्वी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला पदार्पणात टी 20  मध्ये अशीकामगिरी करता आली नव्हती. आयपीएलमध्ये बरिंदर सरां याला सनरायजर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, रॉयल्स आणि पंजाब टीमकडून खेळण्याची संधी मिळाली होती.