Indian Cricketer Jemimah Rodrigues Video Viral : भारताचा महिला क्रिकेटर आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू जेमिमा रोड्रिग्स (Jemimah Rodrigues) हिच्या वडिलांवर धर्मांतरणाचे आरोप केले गेले. जेमिमा ही मुंबईतील सर्वात जुन्या खार जिमखाना क्लबची सदस्य होती, मात्र तिच्या सदस्यत्वाचा वापर हा जेमिमाचे वडील धार्मिक कृत्यासाठी करत असल्याचा आरोप खार जिमखान्याच्या (Khar Gymkhana) अधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेमिमा हीच सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात आले. हे प्रकरण ताज असतानाच आता जेमिमाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 


मंत्र मारताच जेमिमा झाली बेशुद्ध : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर भारतीय महिला क्रिकेटर जेमिमाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जेमिमा जेव्हा जुनिअर लेव्हल क्रिकेट खाल्लेत होती त्या वेळेचा आहे. या व्हिडीओमध्ये जेमिमा एका धार्मिक कार्यक्रमात सांगते की तिने 37 बॉलमध्ये नाबाद 25 धावा केल्या यासाठी मी देवाचे धन्यवाद मानते. एवढं झाल्यावर एक व्यक्ती जेमिमाच्या जवळ येतो आणि काही मंत्रांचं उच्चारण करतो. यानंतर जेमिमा बेशुद्ध होते आणि खाली पडते. तिच्या जवळ उभे असलेलं काही लोक मग तिला उचलून बाजूला नेतात. हा व्हिडीओ 2015 मधला असल्याचे बोलले जाते. 


पाहा व्हिडीओ : 



 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by div_yumm (@divtweets)


जेमिमा रॉड्रिग्सचे तीन वर्षांचे सदस्यत्व रद्द : 


जेमिमावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना खार जिमखानाचे अध्यक्ष विवेक देवनानी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, '20 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधना सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांनी मंजूर केलेल्या ठरावानुसार क्रिकेटर जेमिमा रॉड्रिग्स हिचे तीन वर्षांचे मानद सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला'. खार जिमखान्याने केलेल्या कारवाई आणि आरोपांवर जेमिमा आणि तिच्या वडिलांशी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


जिमखान्याच्या सभागृहात सुरु होते धार्मिक कार्यक्रम : 


खार जिमखाना व्यवस्थापकीय समिती सदस्य शिव मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, 'आम्हाला कळले की जेमिमा रॉड्रिग्जचे वडील हे 'ब्रदर मॅन्युएल मिनिस्ट्रीज' नावाच्या संस्थेशी संलग्न होते. त्यांनी जवळपास दीड वर्षासाठी खार जिमखान्या सभागृह बुक केले होते आणि 35 कार्यक्रम आयोजित केले. तिथे काय चालले होते हे सर्वांना माहीत आहे. आम्ही देशभरात धर्मांतराबद्दल ऐकतो, पण ते आमच्या नाकाखाली होत आहे.  खार जिमखान्याच्या उपविधी नियम 4A नुसार, खार जिमखाना कोणत्याही धार्मिक कार्याला परवानगी देत ​​नाही', असे मल्होत्रा ​​म्हणाले.


हेही वाचा : 'तुमची 'संत्रं' महिन्यातून एकदा...', Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत


 


'अंधारी खोली आणि ट्रान्स म्युझिक' : 


खार जिमखाना क्लबचे माजी अध्यक्ष नितीन गाडेकर म्हणाले की, त्यांना एकाने जेमिमाचे वडील आयोजित करत असलेल्या कार्यक्रमात धर्म परिवर्तन सारख्या गोष्टी होत असल्याची माहिती दिली. तेव्हा आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिलं की तेथे अंधार होता आणि ट्रान्स म्युझिक वाजत होते आणि एक महिला 'तो आम्हाला वाचवायला येत आहे' असं म्हणत होती. मला आश्चर्य वाटलं की जिमखाना अशा कार्यक्रमांना परवानगी कशी देऊ शकते. आम्ही याचा सर्व साधारण सभेत विरोध केला. आणि मग उपस्थित सदस्यांनी मिळून जेमिमाचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय  घेतला.