बांगलादेशविरोधातील तिसऱ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) तुफान फलंदाजी करत शतक ठोकलं आणि पुन्हा एकदा आपली दखल घेण्यास भाग पाडलं. टी-20 मध्ये दमदार कामगिरी करणारा संजू सॅमसन आता कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. संजू सॅमसनने टी-20 मध्ये पहिलं शतक ठोकल्यानंतर आता कसोटीमध्ये संघाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. विशेष म्हणजे संजू सॅमसनने प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त केली आहे. महत्त्वाचं म्हणजे, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून सॅमसन कसोटी चांगली कामगिरी करु शकतो याची खात्री व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Sportstar ला दिलेल्या मुलाखतीत संजू सॅमसनने कसोटीमध्ये आपण यशस्वी कामगिरी करु शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे. पण आपण कसोटीमध्ये बीसीसीआयकडून संधी मिळावी याची वाट पाहत असल्याचं त्याने सांगितलं आहे. 


Ind vs Ban: "तू उगाच रिस्क का घेतली?', सूर्यकुमार यादवची संजू सॅमसनला विचारणा; म्हणाला 'तू मला...'


 


"कसोटीमध्ये खेळण्यासाठी माझ्याकडे कौशल्य आहे असा मला विश्वास आहे. मला स्वत:ला फक्त एकदिवसीय आणि टी-20 पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. भारताकडून कसोटी खेळण्याची माझी इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीच्या आधी मी नेतृत्वाला माझा कसोटी क्रिकेटसाठी विचार करा असं सांगितलं. त्यांनी मला हे गांभीर्याने ङे आणि जरा जास्त रणजी ट्रॉफी सामने खेळा असा सल्ला दिला," अशी माहिती संजू सॅमसनने दिली.


संजू सॅमसनने नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरोधातील टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली असून, अंतिम सामन्यात शतक ठोकलं. संजू सॅमसनने कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी मोकळीक दिल्याने हे शक्य झाल्याचं सांगत त्यांना श्रेय दिलं. 


"सूर्या हा एक चांगला संवाद साधणारा आहे आणि त्याच्याकडे खेळाडूंकडून काय हवे आहे याबाबत स्पष्टता आहे. तो एक चांगला लीडर आहे आणि खेळाडूंचा त्याच्यावर विश्वास आहे. गौतम भाईने मला नेहमीच पाठिंबा आणि पाठबळ दिलं आहे. जेव्हा तुमच्याकडे प्रशिक्षक म्हणून तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा कोणीतरी असेल, तेव्हा क्रिकेट खेळणे अधिक आनंददायी होते,” असं सॅमसन म्हणाला.


"सामान्यत: जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा आपली नेमकी काय भूमिका आहे याबाबत स्पष्टता नसते. पण यावेळी मला तीन आठवडे आधीच बांगलादेशविरोधातील मालिकेत आघाडीला खेळशील असं सांगण्यात आलं. त्यामुळे नव्या भूमिकेसाठी मी मानसिकरित्या तयार होतो," अशी माहिती संजू सॅमसनने दिली.