Smriti Mandhana birthday : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आणि नॅशनल क्रश स्मृती मंधाना आज 28 वा वाढदिवस (Smriti Mandhana birthday) साजरा करत आहे. स्मृती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. आपल्या बेधडक स्टाईलने स्मृतीने क्रिकेटचं मैदान गाजवलंय. त्यामुळे भारतात तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता स्मृती मानधनाला लग्नासाठी (smriti mandhana husband) कसा मुलगा हवाय? यावर तिने स्वत: उत्तर दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृतीने मागील वर्षी 'कौन बनेगा करोडपती'मध्ये हजेरी लावली होती. तुला एका मुलामधे नेमके कोणते गुण हवे आहेत? असा सवाल अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. त्यावर तिने दिलखुलास उत्तर दिलं होतं. 


काय म्हणाली Smirit Mandhana?


मी अशा प्रश्नाची अपेक्षा केली नव्हती. चांगला मुलगा असावा हेच जास्त महत्त्वाचं आहे. तो काळजी घेणारा आणि माझा खेळ समजून घेणारा असावा. हे दोन महत्त्वाचे गुण त्याच्याकडे असले पाहिजेत. कारण एक मुलगी म्हणून मी त्याला जास्त वेळ देऊ शकणार नाही. त्याने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे आणि त्याची काळजीही घेतली पाहिजे. याच प्राथमिकता आहेत. हेच गुण मी मुलात पाहत आहे, असं स्मृतीने म्हटलं होतं. स्मृती मानधना प्रसिद्ध गायक आणि म्यूझिक कम्पोझर पलाश मुछाल (Palash Mucchal) याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे.


दिग्दर्शक संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal). गेल्या अनेक वर्षापासून पलाश आणि स्मृती एकमेकांना डेट (Palash Muchhal Smirit Mandhana Relationship) करत असल्याच्या चर्चा आहेत. राजपाल यादवच्या 'काम चालू है' सिनेमाच्या चित्रिकरणावेळी देखील दोघं एकत्र दिसले होते. तर आरसीबीने वुमेन्स प्रिमियर लीगचा कप जिंकल्यानंतर देखील दोघंही एकत्र दिसले होते. त्यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं.


कोण आहे स्मृती मानधना?


दरम्यान, 18 जुलै 1996 मध्ये स्मृतीचा जन्म झाला. स्मृतीच्या आईचं नाव स्मित, वडिलांचं नाव श्रीनिवास आणि भावाचं नवा श्रावण असं आहे. स्मृती दोन वर्षांची असताना तिचं कुटुंब सांगलीतल्या माधवनगर इथं शिफ्ट झालं. त्यानंतर सांगलीतच स्मृती लहानाची मोठी झाली. स्मृतीला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. स्मृती अवघ्या 11 वर्षांची असताना तिची अंडर 19 संघात निवड झाली. स्मृतीने 10 एप्रिल 2013 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तर ऑगस्ट 2014 मध्ये वर्म्सले पार्क इथं इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं.