Virat Kohli living common man life in london : भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. विराटचे चाहते भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आहेत. विराटाचे हे फॅन्स त्याची खेळण्याची स्टाईल, हेअर स्टाईल, टॅटू इत्यादी सर्वच फॉलो करताना पाहायला मिळतात. विराटचे इंस्टाग्रामवर जवळपास 270  मिलिअन फॉलोअर्स असून तो भारतातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला व्यक्ती आहे. भारतात विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात पण हाच विराट लंडनच्या रस्त्यांवर अतिशय सामान्य व्यक्ती प्रमाणे फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे सिरीजमध्ये भारताचा 0-2  ने पराभव झाला, तर एक सामना बरोबरीत सुटला. यात कर्णधार रोहित शर्मा वगळता इतर कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. रोहित शर्माने या तीन सामन्यांमध्ये 157 धावांची कामगिरी केली. तर विराट कोहलीला मैदानात जम बसवता आला नाही. विराटने तीन सामन्यांच्या मालिकेत केवळ 58 धावाचं केल्या.  श्रीलंका विरुद्ध झालेल्या सिरीजनंतर टीम इंडिया आता बांगलादेश विरुद्ध सिरीज खेळण्यासाठी उतरणार आहे. सप्टेंबर पासून या सिरीजला सुरुवात होणार, तेव्हा यापूर्वी विराट कोहली लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. 


हेही वाचा : 'मेडल 15 - 15 रुपयात विकत घ्या....' Vinesh Phogat ची याचिका फेटाळल्यावर बजरंग पुनियाची पोस्ट व्हायरल


 


विराट कोहलीची पत्नी अनुष्का ही मुलगी वामिका आणि मुलगा अकाय सोबत सध्या लंडनमध्ये राहत आहे. अनुष्का विराटचा मुलगा अकाय याचा जन्म लंडनमध्येच झाला होता. विराट आणि अनुष्काला आपल्या मुलांसह एका सामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगायचं आहे अशी इच्छा त्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून व्यक्त केली होती. मात्र भारतात जिथे विराटची सर्वाधिक फॅन फॉलोईंग आहे तिथे हे शक्य नाही. म्हणून विराट आणि अनुष्का बहुतेकवेळा लंडन येथे जातात. विराटच्या निवृत्तीनंतर तो कुटुंबासोबत लंडनमध्येच स्थायिक होणार असल्याच्या सुद्धा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या.  



लंडनमध्ये कॉमन मॅन प्रमाणे वावरतोय विराट : 


विराट कोहलीचा लंडनमधील एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात विराट रस्ता क्रॉस करताना दिसतोय. विराट हा लंडनमधील पादचाऱ्यांसाठी असणारे सर्व नियम पाळून रस्ता क्रॉस करताना पाहायला मिळतोय. व्हिडिओत विराट अगदी साध्या कपड्यांमध्ये असल्याने त्याला ओळखणं अवघड आहे. त्यामुळे भारताप्रमाणे विराटच्या आसपास चाहत्यांचा घोळका दिसत नाही.