लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. पण प्रेक्षकांसाठी हा सामना लढाईपेक्षा कमी नव्हता. मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना चिडवलं. मॅच संपल्यावर ड्रेसिंग रूममध्ये जाताना भारतीय खेळाडूंना उद्देशून पाकिस्तानी प्रेक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी प्रेक्षकाच्या या चिडवण्यावर भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी चांगलाच भडकला. भारतीय खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जात असताना पाकिस्तानी प्रेक्षकांनी बाप कौन है असा प्रश्न विचारला. हे ऐकून मोहम्मद शमी चांगलाच भडकला. त्या प्रेक्षकाकडे जायचा प्रयत्न शमीनं केला पण धोनीनं मध्यस्ती करत शमीला शांत केलं.


पण यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, ज्या पाकिस्तानी फॅनने असभ्य वर्तन केलं त्या फॅनला मैदानाबाहेर भारतीय फॅन्सने फटकवलं असा दावा या व्हिडिओतून करण्यात येत आहे.


पाहा व्हिडिओ