मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2022 (T 20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये इंग्लंडने (England) टीम इंडियाचा (Team India) पराभव केला. या पराभवानंतर टीम इंडियावर सडकून टीका केली जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफने (Shebaz Sharif) टीम इंडियाला उद्देशून एक ट्विट केलं. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. या ट्विटवर टीम इंडियाचा माजी ऑलराउंडर इरफान पठाणने (Irfan pathan) जबरदस्त उत्तर दिलंय. इरफानने उत्तर देत पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं तोंड बंद केलंय. (indian former cricketer irfan pathan gived replis to pakistan pm shebaz sharif tweet over to team india loss against england)


शरीफ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या रविवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. रविवारी 152/0 विरुद्ध 170 असा सामना होणार आहे", असं ट्विट करत शरीफ यांनी टीम इंडियाला चिमटा काढला. या ट्विटला इरफानने चांगलंच उत्तर दिलंय. 



इरफानचं उत्तर


"तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. आम्ही आमच्या आनंदाने आनंदी आहोत तर तुम्ही दुसऱ्याच्या त्रासामुळे. त्यामुळे स्वत:च्या देशाच्या प्रगतीकडे लक्ष नाही", असं उत्तर देत इरफानने शरीफला सुनावलं. 


दरम्यान रविवारी पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कप फायनलसाठी महामुकाबला होणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी 1 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय. त्यामुळे कोणती टीम दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.