नीरज चोप्राचा तो गायब झालेला भाला ऐनवेळी पाकिस्तानच्या खेळाडूच्या हातात दिसला...नाहीतर
टोक्यो ऑल्मिपिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला तब्बल 13 वर्षानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलं.
मुंबई : टोक्यो ऑल्मिपिकमध्ये (Tokyo Olympics 2020) नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भारताला तब्बल 13 वर्षानंतर गोल्ड मेडल मिळवून दिलं. नीरजने ट्रॅक अँड फिल्ड (Javelin Throw) मध्ये 87.58 मीटर लांब भाला फेकत ऐतिहासिक कामगिरी केली. नीरज व्यतिरिक्त भारतीयांचं पाकिस्तानच्या अरशद नदीमच्या (Arshad Nadeem) कामगिरीकडे लक्ष होतं. नदीमला मेडल जिंकता आलं नाही. मात्र त्याने उल्लेखनीय कामगिरी करत 5 वा क्रमांक पटकावला. (indian javelin thrower neeraj chopra on Pakistani olympic athlete Arshad Nadeem)
नीरज माझा आदर्श तसंच प्रेरणास्थान आहे, असं नदीमने अनेकदा म्हटलंय. त्याचबरोबर, नीरज नदीमच्या कामगिरीवरही खूश आहे. तसेच नदीमपासून प्रेरणा घेऊन आणखी पाकिस्तानी खेळाडू भालाफेककडे वळतील, अशी आशा नीरजने व्यक्त केली होती. दरम्यान नीरजने टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना नीरजने खुलासा केला.
नीरज काय म्हणाला?
"फायनल सामन्याच्या आधी मी माझा भाला शोधत होतो. भाला सापडत नव्हता. अचानक पणे तो भाला पाकिस्तानचा अरशद नदीम घेऊन फिरत होता. मी त्याला म्हटलं, "भावा हा माझा भाला आहे, मला परत कर. मला याने थ्रो करायचा आहे. तेव्हा नदीमने हा भाला परत दिला. तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की माझा पहिला थ्रो गडबडीत केला", असं नीरज म्हणाला.
नीरज नदीमबाबत काय म्हणाला?
"नदीमने क्वालिफाइंग राऊंडमध्ये दमदार कामगिरी केली. तसेच त्याने फायनलमध्ये उल्लेखनीय खेळ दाखवला. पाकिस्तानला भालाफेकीत आवड दाखवण्यासाठीची सुवर्णसंधी आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करु शकतं" असं नदीमने स्पष्ट केलं.
नीरजचा पाकिस्तानला संदेश
दरम्यान नीरजने पाकिस्तानी नागरिकांना एक संदेश दिला."अरशद नदीमला सपोर्ट करा. नदीमने पाकिस्तानला भालाफेकीत नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे तुम्ही नदीमला सपोर्ट करण्याची गरज आहे", असं नदीम म्हणाला.