Satwik Sairaj, Chirag Shetty: भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय जोडीने अंतिम फेरीत मलेशियाच्या वूई यिक सोह आणि अॅरॉन चिया या जोडीचा 21-17 आणि 21-18 असा पराभव केला. भारतीय जोडीचं हे पहिले सुपर 1000 वर्ल्ड टूर विजेतेपद ठरलं आहे. (satwik sairaj rankireddy and chirag shetty win Indonesia Open 2023 beat malaysia pair in final)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली. मलेशियाच्या आरोन चिया आणि वूई यिक सोह यांनी कडवी झुंज दिली मात्र, अखेर भारताचा पगडा जड राहिला. सात्विक आणि चिराग यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सात्विक आणि चिराग यांनी पहिला सेट 21-17 अशा फरकाने जिंकला. विजयी आघाडी घेतल्यानंतर दुसरा डाव अवघड जाईल असं वाटत होतं. मात्र, मलेशियाच्या जोडीचा पुनरागमनाचा प्रयत्न भारतीय जोडीने हाणून पाडला. सात्विक आणि चिरागने दुसरा गेम 21-18 असा जिंकला.


सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने इंडोनेशिया ओपन सुपर 1000 बॅडमिंटनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. 41 वर्षात पहिल्यांदा कोणा एका भारतीय जोडीने ओपन सुपर 1000 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. मागील 7 वेळा जेव्हा जेव्हा भारतीय जोडी मलेशिया विरुद्ध भिडली, तेव्हा मलेशियाचं पारडं जड राहिलं होतं. मात्र, आता भारतीय खेळाडूंनी बाजी मारली आहे.


आणखी वाचा - 'मी मंत्रमुग्ध झालोय...'; हर्षा भोगले यांनी केली बेन स्टोक्सची 'या' भारतीय खेळाडूशी तुलना!


दरम्यान, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने दक्षिण कोरियाच्या मिन ह्युक आणि सेउंग जे सेओ यांचा 18-21, 21-19, 21-18 असा पराभव केला होता. दक्षिण कोरिया पराभव करत दोघांनी फायनलमध्ये (Indonesia Open Double Title) मजल मारली होती. त्यानंतर आता फायनल जिंकून भारतीय पठ्ठ्यांनी इतिहास रचला आहे.