भारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा
India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे.
India Sports : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा 11 ऑगस्टला समारोप झाला. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभगी झालं होतं. पण भारताला केवळ 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांवर समाधान मानावं लागलं. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. भारतात लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (National Cricket Academy) उभारली जाणार आहे. ज्यात क्रिकेटर्सबरोबरच अथॅलेटिक्स (Athletics) खेळाडूही सराव करु शकणार आहेत. या खेळाडूंना अत्याधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचं जय शाह यांनी सांगितलं. भारतीय अॅथलेटिक्स खेळाडूंच्या मागे बीसीसीआय नेहमीच उभी राहिली आहे आणि भविष्यातही सर्वोतोपरी मदत केली जाईल. या अकॅडमीत विराट कोहली, नीरज चोप्रासारखे खेळाडू एकाचवेळी सराव करु शकणार आहेत.
सध्याची राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी बंगळुरुमध्ये आहे. याच शहरात नवी अकॅडमी उभारली जात असून याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. पुढच्या महिन्यात नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे. बीसीसीआयच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टपैकी हा एक प्रोजेक्ट असल्याचं जय शाह यांनी सांगितलं.
नुकतीच जय शाह यांनी पॅरिस ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या नीरज चोप्राची भेट घेतली होती. याा भेटीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी नीरज चोप्राला आश्वासन दिलं होतं, क्रिकेटर्सबरोबरच इतर खेळातील खेळाडूंनाही अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील. नीरजला दिलेलं हे आश्वासन जय शाह यांनी पूर्ण केलंय. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेली नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी सर्वच खेळातील खेळाडूंसाठी खुली असेल.
नव्या अकॅडमीची वैशिष्ट्य
नव्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत तब्बल 100 खेळपट्या असणार आहे. यात 45 इनडोर टर्फचा समावेश असेल. याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपटट्या असणार आहेत. त्यामुळे परदेश दौऱ्यावर जाण्याआधी टीम इंडियाा या खेळापट्ट्यांवर सराव करता येणार आहे. बीसीसीआय खेळाडूंसाठी सर्वोतोपरी मदत करु इच्छितं असं जय शाह यांनी सांगितलं.
ऑक्टबर 2019 मध्ये आपण बीसीसीआयच्या सीईओ पदाचा कार्यभार सांभाळला.. पण त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष वाया गेली. त्यामुळे आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या कार्यकाळात हा भव्य-दिव्य प्रकल्प साकारत असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असंही जय शाह यांनी म्हटलंय.