INDvsNZ: भारतीय संघ अवघ्या ९२ धावात गारद
न्युझीलंड संघासमोर ९३ धावांचे लक्ष्य
हॅमिल्टन: मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय संघ अवघ्या ९२ धावांपर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडच्या भेदक गोलंदाजीने भारतीय संघाचे कंबरड मोडलं . न्युझीलंड संघाकडून ट्रेंड बोल्टने चांगली कामगिरी केली आहे.
ट्रेंड बोल्टने चौथ्या सामन्यात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. भारतीय संघाचा आठवा विकेट पडला आहे. हार्दिक पांड्या १६ करुन आउट झाला. भारत: 55/8 (20 ओव्हर)
भारत आणि न्युझीलंडमध्ये सुरु असलेला सामन्यात भारतीय संघाने भुवनेश्वर कुमारच्या रुपात सातवा विकेट गमवला आहे. भुवीला कोलिन ग्रॅन्डहोम ने केवळ १ रनावर रोखले. भारत: 40/7 (17 ओव्हर)
भारतीय संघाचा सहावा विकेट पडला. केदार जाधवला ट्रेंड बोल्टने एलबीडब्लयू केले. केदार केवळ १ रन करु शकला. भारत: 35/6 (14 ओव्हर)
भारत आणि न्युझीलंडमध्ये सुरु असलेला सामन्यात भारतीय संघाचा आणखी एक विकेट पडला आहे. शुभमन गिल ट्रेंट बोल्ट चे शिकार झाला. गिल ने २१ चेंडूवर ९ रन केले. भारत: 33/5 (12 ओव्हर)
दिनेश कार्तिकने शुन्यावर आउट झालामुळे भारतासाठी अडचणी निर्माण होत असताना दिसत आहे. भारत: 33/4 (11ओव्हर)
भारताचा तिसरा विकेटही लवकर गेला. अंबाती रायडू शुन्यावर आउट झाला. भारत: 33/4 (11ओव्हर)
ट्रेंट बोल्ट ने भारताला दुसरा झटका दिला. बोल्टने रोहितला त्याच्याच गोलदांजीवर झेल घेतली. रोहित शर्मा २३ चेंडुवर केवळ ७ रन करु शकला. भारत: 33/3 (10.2 ओव्हर)
भारतीय संघाचा पहिली विकेट पडली. शिखरला ट्रेंट बोल्टने एलबीडब्ल्यू केले. शिखरने २० चेंडूचा सामना करत १ चौकार आणि षटकारच्या मदतीने १३ रन केले. भारत: २१/१ (६ ओव्हर)
भारतीय संघाचे कर्णधार रोहीत शर्मा आणि शिखर धवनने संघाला चांगली सुरुवात दिली आहे. भारत: २१/० (५ ओव्हर)
तिसऱ्या ओव्हरमध्ये शिखर धवनने मॅट हेनरीला १ चौकार लगावल्यानंतर १ षटकार मारला.
भारतीय इनिंगची सुरुवात झाली आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहीत शर्मासोबत शिखर धवन सलामी देत आहेत. न्युझीलंडसाठी पहिला ओव्हर मॅट हेनरीने फेकली. भारत: ३/० ( १ ओव्हर)
न्युझीलंड संघाचे कर्णधार केन विलियमसनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्युझीलंडच्या संघात तीन बदल केले आहे. मुनरो, साउदी आणि लॉकी फग्युर्सन खेळणार नाहीत. त्यांच्या जागेवर जेम्स नीशाम टॉड एस्टल, मॅट हेनरी यांना चौथ्या संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघाने पहिल्या ३ सामन्यात विजय मिळवून मालिका आपल्या नावावर केली आहे. न्युझीलंड संघाला क्लीन स्पीपपासून वाचण्यासाठी मोठे आव्हान आहे. तसेच घरातील मैदानात उत्तम रेकार्ड असूनही न्युझीलंड संघ कमजोर दिसू लागले आहे. मालिकेतील शेवटच्या २ सामन्यात विजय मिळवण्यासाठी न्युझीलंड संघ प्रयत्न करेल.
संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केदार जाधव, अंबादी रायडू, दिनेश कार्तिक, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद.
न्युझीलंड: केन विलियम्सन (कर्णधार), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, टाम लाथम, मार्टिन गुप्टिल, कोलिन डि ग्रॅन्डहोम, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशाम टॉड एस्टल, मॅट हेनरी, ईश सोढ़ी, मिचेल सैंटनर.