टीम इंडियाच्या या फास्टर बॉलरने गुपचूप केले लग्न!
२०१२ मध्ये भारतीय क्रिकेट संघातून इंग्लंडविरुद्ध खेळलेला फास्ट बॉलर परविंदर अवाना याने गुपचूप लग्न केले.
नवी दिल्ली : २०१२ मध्ये भारतीय क्रिकेट संघातून इंग्लंडविरुद्ध खेळलेला फास्ट बॉलर परविंदर अवाना याने गुपचूप लग्न केले.
कोणाशी केले लग्न?
गाजियाबादच्या भोपूरा येथे हा विवाहसोहळा पार पडला. या विवाहास नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार सहभागी झाला होता. परविंदर दिल्लीतील पोलिस सब इंस्पेक्टर संगीता कसानासोबत ७ मार्चला विवाहबद्ध झाला. परविंदर इंग्लंडविरुद्ध खेळल्यानंतर पुन्हा भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवू शकला नाही. मात्र आयपीएलच्या ३ सीजनमध्ये तो खेळला.लग्नाचे रिसेप्शन १० मार्चला नोएडात होणार आहे. रिसेप्शनला अनेक मान्यवर आणि क्रिकेटर्स उपस्थित राहण्याची आशा आहे.
फास्ट बॉलर म्हणून ओळख
परविंदर IPL मध्ये किंग्स इलेवन पंजाब या टीममधून खेळत होता. IPL चे ही त्याने २०१२, २०१३ आणि २०१४ हे तीन सीजनच खेळले आहेत. २००७ पासून परविंदरने क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती.
आपल्या खेळातून परविंदरने फास्ट बॉलर म्हणून आपली ओळख बनवली.