अंडर-१९ टीम न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या वर्ल्ड कपसाठी रवाना
अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटर्सकडून कायमच नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉ यानं दिलीय.
मुंबई : अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटर्सकडून कायमच नवीन गोष्टी शिकायला मिळतात अशी प्रतिक्रिया भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉ यानं दिलीय.
१३ जानेवारीपासून सामने
न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारीपासून सुरु होणा-या वर्ल्डकप स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी पृथ्वी शॉ आणि कोच राहुल द्रविड यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी चौथ्यांदा अंडर-१९ वर्ल्ड कप भारतात आणण्यासाठी मेहनत घेत असल्याचे पृथ्वी शॉ आणि राहुल द्रविडने सांगितले.
कोच राहुल द्रविडचं कौतुक
कोच द्रविड कायमच टीममध्ये सकारात्मक भावना निर्माण करत प्रत्येकाला प्रेरित करत असतात असंही पृथ्वीने यावेळी आवर्जून सांगितलं. रणजी आणि दुलीप ट्राफीमध्ये आठ मॅचेसमध्ये पाच सेंच्युरी आणि तीन सेंच्युरी झळकावणा-या पृथ्वी शॉ आणि इतर भारतीय क्रिकेटरकडून तमाम भारतीय फॅन्सना ब-याच आशा आहेत.