Indian Team Schedule: भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघ 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लॉर्ड्स, आयकॉनिक ओव्हल, वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल हेडिंग्ले या ठिकाणी भारत आणि इंग्लंड यांच्यात सामने होणार आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) बुधवारी ही घोषणा केली. ECB ने 2025-2031 मधील 7 वर्षांच्या सायकलसाठी पुरुष आणि महिला संघ देशांतर्गत कॅलेंडर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) नुसार, भारत जून-2025 मध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.


5 मैदानांवर होणार सामने


ईसीबीने जारी केलेल्या निवेदनानुसार, पतौडी ट्रॉफीचे हे सामने लॉर्ड्स, द ओव्हल (दोन्ही लंडनमध्ये), एजबॅस्टन (बर्मिंगहॅम), हेडिंग्ले (लीड्स) आणि ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) येथे खेळवले जातील. 2029 मालिकेत, हेडिंग्लेची जागा साउथॅम्प्टनच्या रोझ बाउलने घेतली आहे तर उर्वरित चार ठिकाणे लॉर्ड्स, ओव्हल, एजबॅस्टन आणि ओल्ड ट्रॅफर्ड राहतील. दोन वर्षांपूर्वी साउथहॅम्प्टनमध्येच न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final-2021) च्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता.


इंग्लंडचा संघही येणार भारतात 


ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, भारत हा एकमेव संघ ज्यांच्याविरुद्ध इंग्लंड देश आणि परदेशात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळतो. इंग्लंडचा पुढील भारत दौरा जानेवारी 2024 मध्ये होईल, जिथे पाच कसोटी सामने खेळवले जातील. हे सामने अँथनी डी मेलो ट्रॉफीसाठी खेळवले जातील. 


भारत आणि इंग्लंड 2014 पासून कसोटी मालिकेत पाच सामने खेळत आहेत. इंग्लंडचा २०२०-२१ चा भारत दौरा याला अपवाद होता. त्यानंतर मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी एक कसोटी कमी करण्यात आली. कोरोना महामारीमुळे ही मालिका पुढे ढकलावी लागली. भारताने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका जिंकली होती.