मुंबई : चॅम्पियन टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार रेकॉर्ड करणारी टीम आहे. भारताने आयसीसीच्या या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक मॅचेस जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया देखील याबाबतीत भारताच्या मागे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विजय


1. भारत: मॅच 24, विजय 15, पराभव 6, 
2. श्रीलंका: मॅच 24, विजय 13, पराभव 9 
3. वेस्टइंडिज: मॅच 24, विजय 13, पराभव 10 
4. ऑस्ट्रेलिया: मॅच 21, विजय 12, पराभव 7, ड्रॉ 2
5. न्यूझीलंड: मॅच 21, विजय 12, पराभव 8 
6. इंग्लंड: मॅच 21, विजय 11, पराभव 10 
7. दक्षिण आफ्रिका : मॅच 21, विजय 11, पराभव 9, ड्रॉ 
8.पाकिस्तान: मॅच 18, विजय 7, पराभव 11 
9. बांगलादेश: मॅच 8, विजय 1, पराभव 7


वेस्टइंडीज 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नसणार आहे. कारण ते रँकिंगमध्ये पहिल्या ८ संघामध्ये नाही आहेत.


वर्ल्ड कपनंतर सर्वात महत्वपूर्ण वनडे टूर्नामेंटची सुरुवात 'आईसीसी नॉक आउट' टूर्नामेंट म्हणून 1998 मध्ये झाली. त्या वर्षी विजेता टीमला विल्स इंटरनॅशनल कप दिला गेला होता.


2002 मध्ये याचं नाव बदलून चॅम्पियन्स ट्रॉफी ठेवलं गेलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया 2-2 वेळा चॅम्पियन राहिले आहेत. इंग्लंडच्या टीमने मात्र एकदाही ही टुर्नामेंट जिंकली नाही. 


कोणत्या संघाने कधी जिंकला कप


1. विल्स इंटरनेशनल कप (बांग्लादेश), 1998-99, द. आफिकेने जिंकला


2. आयसीसी नॉकआउट (केनिया), 2000-01, न्यूझीलंडने जिंकला


3. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (श्रीलंका), 2002-03, भारत-श्रीलंका संयुक्त विजेता


4. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लैंड), 2004, वेस्टइंडिजने जिंकला


5. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (भारत), 2006-7, ऑस्ट्रेलियाने जिंकला विजेता


6. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (द. आफ्रिका), 2009-10, ऑस्ट्रेलियाने जिंकला


7. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लैंड), 2013, भारताने जिंकला