Smriti Mandhana: भारतीय महिला संघाची (Indian Women Cricket Team) स्टार खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखली जाते. स्मृती मंधाना सध्या इंग्लंडमध्ये असून तिथे ती 'द हंड्रेड क्रिकेट' स्पर्धेत खेळत आहे. याचदरम्यान स्मृती मंधानासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीने (ICC) स्मृती मंधानाचा समावेश एका खास यादीत केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'या' खास यादीत समावेश 
आयसीसीने शुक्रवारी  '100 टक्के क्रिकेट सुपरस्टार' यादी जाहीर केली. यात भारतीय महिला संघाची युवा फलंदाज शेफाली वर्माबरोबर स्मृती मंधानाचाही समावेश करण्यात आला आहे. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधानाबरोबरच इंग्लंड संघाची सोफी एक्लेस्टोन, न्यूझीलंड संघाची अमेलिया केर, वेस्टइंडिज संघाची हॅली मॅथ्यूज आणि दक्षिण आफ्रिका संघाची लॉरा वोल्वार्डट या महिला खेळाडूंचा या यादीत समावेश आहे.


स्मृती मंधानाची क्रिकेट कारकिर्द
स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळकली जाते. अगदी कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मृती मंधानाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2021 मध्ये आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं होतं. आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटच्या यादीत स्मृती मंधाना 10व्या तर टी-20 क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. 


मंधानाने 74 एकदिवसीय सामन्यात 2 हजार 892 धावा केल्या आहेत, यात पाच शतकांचा समावेश आहे. तर 23 अर्धशतकं तिच्या खात्यात जमा आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 92 सामन्यात 2 हजार 192 धावा तिने केल्या आहेत. यात 16 अर्धशतकं तिच्या नावावर आहेत. मंधानाने चार कसोटी सामनेही खेळले आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.