है तयार हम! श्रीलंकेत भारतीय युवा संघाचा सराव सुरु, BCCIने शेअर केला व्हिडिओ
13 जुलैपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय युवा संघाचा जोरदार सराव
मुंबई : शीखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झालेल्या भारतीय युवा संघाने सरावाला सुरुवात केली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू कसून सराव करत आहेत.
भारतीय खेळाडूंच्या सरावाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत राहुल द्रविडने श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. 'भारतीय संघातील खेळाडू 17 दिवस क्वारंटाइमध्ये होते आता बाहेर येऊन सराव सुरु केला आहे. खेळाडू उत्साही आहेत. थोडे हसण्या खेळण्याची संधी मिळत आहे' असं द्रविडनं म्हटलं आहे.
अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संघ
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने 20 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. यात अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांचा समावेश आहे. तसंच संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
भारत - श्रीलंका मालिकेचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका
- पहिला एकदिवसीय सामना – 13 जुलै
- दुसरा एकदिवसीय सामना – 16 जुलै
- तिसरा एकदिवसीय सामना – 18 जुलै
टी-20 मालिका
- पहिला टी-20 सामना – 21 जुलै
- दुसरा टी-20 सामना – 22 जुलै
- तिसरा टी -20 सामना – 25 जुलै