मुंबई : टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधला पहिला क्रमांक धोक्यात आला आहे. न्यूझीलंडला टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची संधी आहे. बुधवारपासून न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजपासूनच न्यूझीलंड त्यांच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात करणार आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज जिंकल्यास किंवा ड्रॉ केल्यास न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी टेस्ट क्रमवारीत सध्या भारत ११३ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर, न्यूझीलंड १११ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिका (१०८ पॉईंट्स) तिसऱ्या क्रमांकावर, इंग्लंड (१०५ पॉईंट्स) चौथ्या क्रमांकावर, ऑस्ट्रेलिया (९८ पॉईंट्स) पाचव्या क्रमांकावर आहे.


श्रीलंकेतल्या खेळपट्ट्या या भारताप्रमाणेच स्पिनरना अनुकूल असतात. त्यामुळे न्यूझीलंडने ४ स्पिनरना टीममध्ये स्थान दिलं आङे. टॉड एस्टल, विलियम सोमरविल्ले, मिचेल सॅन्टनर आणि अजाज पटेल यांची टीममध्ये निवड झाली आहे. मुंबईमध्ये जन्मलेल्या अजाज पटेलने नेगोम्बोविरुद्ध सराव सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या.


मिचेल सॅन्टनरने २ वर्षानंतर टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. २०१७ साली सॅन्टनरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर त्याने एकही टेस्ट मॅच खेळली नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर सॅन्टनर वर्ल्ड कपमध्ये खेळला.


न्यूझीलंडच्या टीममध्ये ४ स्पिनरसोबतच ४ फास्ट बॉलरही आहेत. टेन्ट बोल्ट, टीम साऊदी, नील वेगनर आणि कॉलिन डि ग्रॅण्डहोम या फास्ट बॉलरना संधी देण्यात आली आहे. टॉम ब्लंडेल हा विकेट कीपर आहे.


न्यूझीलंडची टीम


केन विलियमसन (कर्णधार), टॉड एस्टल, टॉम ब्लंडेल, ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, टॉम लेथम, हेनरी निकोल्स, एजाज पटेल, जीत रावल, विल समरविले, मिचेल सॅन्टनर, टीम साऊदी, रॉस टेलर, नील वेगनर, बीजे वॉटलिंग