जकार्ता : एका सामन्या दरम्यान आपल्याच टीममधील खेळाडूशी टक्कर झाल्याने इंडोनेशियाचा दिग्गज गोलकिपर चोईरूल हुडा याचा मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्सेला लामोनगन क्लबच्या सामन्या दरम्यान पहिल्या हाफमध्ये ३८ वर्षीय गोलकिपर हुडाची खेळाडू रामोन रोड्रिगेजसोबत टक्कर झाली. लीग-१ मध्ये पार्सेला लामोनगन रविवारी रात्री सेमेन पडांग विरूद्ध सामना खेळत होते. हुडाला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 



पार्सेला क्लबचे कोच अजी सांतोतो यांनी ‘गोल डॉट कॉम’ला सांगितले की, ‘सामना संपल्यावर सर्वच खेळाडू लगेच रूग्णालयात गेले. तेव्हा आम्हाला हुडाच्या निधनाची बातमी मिळाली. त्याची निधनाची बातमी पचवणं सर्वांसाठीच कठिण होतं’. पार्सेलामध्ये १९९९ मध्ये सामिल झालेल्या हुडाने त्याच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत क्लबसाठी ५०३ स्पर्धा खेळल्या.