हिटमॅन रोहित शर्माने केले `हे` चार रेकॉर्ड्स
टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने नागपूर वन-डे मॅचमध्ये एक-दोन नाही तर तब्बल चार रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
नागपूर : टीम इंडियाचा हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्माने नागपूर वन-डे मॅचमध्ये एक-दोन नाही तर तब्बल चार रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
रोहित शर्माने नागपूर वन-डे मॅचमध्ये आपली १४वी सेंच्युरी पूर्ण केली. यासोबतच रोहितने युवराज सिंगच्या वन-डेतील १४ सेंच्युरींची बरोबरी केली आहे. एक नजर टाकूयात रोहित शर्माने केलेल्या चार रेकॉर्ड्सवर...
१) रोहितने पूर्ण केले ६,००० रन्स:
रोहित शर्माने आपल्या वन-डे मॅचेसमध्ये ६००० रन्स पूर्ण केले आहेत. या मॅचमध्ये रोहित शर्माने ९२वा रन काढताच त्याने आपले सहा हजार रन्स पूर्ण केले. जलदगतीने ६००० रन्स पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा भारतातील तिसरा क्रिकेटर ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर सौरव गांगुली आणि तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा पोहोचला आहे.
२) रोहितने ४,००० रन्स केले पूर्ण:
रोहितने वन-डे मॅचेसमध्ये एक ओपनर बॅट्समन म्हणून ४ हजार रन्स पूर्ण केले आहेत. २०११ सालापासून ओपनिंग करणाऱ्या रोहितने ४००० रुन्स पूर्ण करत ओपनिंग बॅट्समन ठरला आहे. रोहितने हा रेकॉर्ड ८३ इनिंग्समध्ये गाठला आहे. पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा नंबर आहे. आमलाने ७९ इनिंग्समध्ये हा रेकॉर्ड केला आहे.
३) विराट कोहलीला टाकलं मागे:
रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरोधात आठवी सेंच्युरी केली आहे. यासोबतच तो भारताकडून ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक सेंच्युरी लगावण्याच्या यादीत स्थान मिळवलं आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (९ सेंच्युरी), रोहितने या दरम्यान विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या नावावर ५ सेंच्युरी आहेत.
४) २०१७मध्ये सर्वाधिक सिक्सर:
रोहित शर्माने १०९ बॉल्समध्ये १२५ रन्स केले. या दरम्यान रोहितने पाच सिक्सर लगावले. यासोबतच रोहितने यंदाच्या वर्षात सर्वाधिक सिक्सर लगावण्याच्या यादित अव्वल क्रमांक मिळवला आहे. रोहित शर्माने २०१७मध्ये आतापर्यंत २९ सिक्सर लगावले आहेत. रोहितने हार्दिक पांड्यालाही मागे टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नावावर २८ सिक्सर आहेत.