मुंबई : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमधील चौथी मॅच आज बंगळुरुत खेळली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाची विजयी घौडदोड कायम राखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर ऑस्ट्रेलिया पहिला विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असेल. टीम इंडियाने ही मॅच जिंकताच कॅप्टन विराट कोहली याच्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे.


चेन्नई, कोलकाता आणि इंदूर येथे टीम इंडियाने केलेलं प्रदर्शन पाहता बंगळुरु वन-डे मॅचमध्येही भारतचं विजयी होईल असे दिसत आहे. फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा पराभव करणं ऑस्ट्रेलियासाठी तितकं सोपं नाहीये.


धोनीचा रेकॉर्ड तोडणार विराट कोहली


चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवल्यास कॅप्टन विराट कोहली हा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याचा रेकॉर्ड तोडणार आहे. विराट कोहलीच्या कॅप्टनशीपमध्ये ही मॅच जिंकल्यास माजी कॅप्टन एम एस धोनीच्या रेकॉर्ड मोडला जाणार आहे.


महेंद्र सिंग धोनी कॅप्टन असताना सलग ९ वन-डे मॅचेसमध्ये विजय मिळवला होता. २००८-०९ दरम्यान धोनीच्या कॅप्टनशीपमध्ये टीम इंडियाने सलग ९ वन-डे मॅचेस जिंकल्या होत्या. तिसरी वन-डे मॅच जिंकल्यावर विराटने या रेकॉर्डची बरोबरी केली होती मात्र, आता हा रेकॉर्ड मोडला जाणार असल्याचं दिसतयं.