मुंबई : पुढच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मासह पाच खेळाडूंच्या खेळण्याबाबत शंका आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेलेल्या टीम इंडियाच्या पाच खेळाडूंवर बायो सिक्योर बबल तोडल्याचा आरोप आहे. शुक्रवारी, 1 जानेवारी रोजी एका चाहत्याने व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात रोहित, शुभमन गिल, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हॉटेलमध्ये बसलेले दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी (२ जानेवारी) एक निवेदन प्रसिद्ध करून सांगितले की, बायो-वेव्ह तोडण्यासाठी खेळाडूंचा शोध घेण्यात येत आहे आणि तोपर्यंत या सर्वांना भारतीय संघापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी हे भारतीय आणि ऑस्ट्रेलिया संघापासून विभक्त झाले आहेत परंतु ते प्रशिक्षण घेऊ शकतील.


भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना कडक प्रोटोकॉल अंतर्गत अत्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले आहे जेणेकरुन दोन्ही संघांचे खेळाडू योग्य वातावरणात खेळू शकतील. बीसीसीआय आणि सीए या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि बायो सिक्योरिटी प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यास खेळाडूंवर कारवाईची शक्यता आहे.


बायो बबलपासून विभक्त झाल्यामुळे आता या सर्व प्लेयर्सना 14 दिवसांचा क्वारंटाईन नियम लागू होऊ शकतो. असे झाल्यास रोहितसह हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना खेळू शकणार नाहीत. हा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे खेळला जाणार आहे. १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी १५ जानेवारीपर्यंत चालेल.


भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा, विकेटकीपर ऋषभ पंत, सलामीवीर पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही अशीच एक घटना पाहायला मिळाली. टीमचा बायो सिक्योरिटी प्रोटोकॉल तोडत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने त्याच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. त्याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आर्चरवर एका सामन्यासाठी बंदी घातली गेली. अशा परिस्थितीत बीसीसीआय भारताच्या या पाच खेळाडूंवर काय कारवाई करते हे पहावे लागेल.