नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सीरिजमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचं सगळीकडूनच कौतुक केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली आणि टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांनी हार्दिकचं कौतुक केल्यावर आता हार्दिकचा भाऊ क्रिकेटर कृणाल पांड्यानेही त्याचं कौतुक केलंय. कृणाल पांड्याने ट्विट करत आपल्या भावाचं कौतुक केलं. कॄणालने लिहिले की, ‘हार्दिकने सीरिजआधी मला वचन दिलं होतं की, तो त्याचं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून सीरिजमध्ये छाप पाडेल. आज त्याने करून दाखवलं आहे. मी गर्वाने म्हणू शकतो, ‘तू करून दाखवलं’. 



हार्दिकने चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात दुहेरी कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्याने या सामन्यात ६६ बॉल्समध्ये ८३ रन्सची दमदार खेळी केली होती. ८३ रन्सच्या दमदार खेळीत त्याने ५ शानदार सिक्सरही लगावले होते. तर दुस-यांदा इंदोर इथे झालेल्या सामन्यात त्याने ७२ बॉल्समध्ये ७८ रन्स केले होते. तर बंगळुरू येथील वनडे सामन्यात त्याने ४० बॉल्समध्ये ४१ रन्स केले होते.