मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा यशस्वीरित्या जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध मायदेशी खेळण्यास सज्ज झाला आहे. 24 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलिया संघ भारताविरोधात 2 टी20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. यासाठी शुक्रवारी ऑस्ट्रेलिया संघाविरोधात तीन टी20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी पहिल्या दोन तसेच अखेरच्या तीन सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असल्याचं कळत आहे. या मालिकेतील कामगिरीच्या बळावरच वर वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचा प्रत्येक भारतीय खेळाडूचा मानस असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धात होणाऱ्या मालिकेसाठी विराटचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी बीसीसीआयने विराट कोहलीला आराम देण्याचं ठरवंलं होतं. ऑस्ट्रेलिया विरुद्धातील पहिल्या दोन सामन्यासाठी संघात समावेश न केलेल्या भुवनेश्वर कुमारचा अखेरच्या  ३ सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.


पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडु, केदार जाधव (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहाल, कुलदीप यादव, विजय शंकर, ऋषभ पंत, सिद्दार्थ कौल आणि केएल राहुल.



उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडु, केदार जाधव, एमएस धोनी (कीपर), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहाल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर,  के.एल. राहुल, ऋषभ पंत.



टी-२० मालिकेसाठी कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्लिया सोबत २ टी-२० सामने खेळणार आहे. एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर बंदी उठवल्यानंतर के.एल. राहुल पहिल्यांदाच खेळणार आहे. 


टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ  : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (कीपर), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, सिद्दार्थ कौल आणि मयांक मार्केंड्य.