विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला. विजयासाठी १२७ रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं शेवटच्या बॉलवर विजय मिळवला. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं भारताला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर भारताला २० ओव्हरमध्ये फक्त १२६ रनपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून ओपनर केएल राहुलनं सर्वाधिक ५० रन केले. तर धोनीनं नाबाद २९ रनची खेळी केली. या मॅचमध्ये राहुलनंतरचा धोनीचा हा दुसरा सर्वाधिक स्कोअर होता, तरी धोनीला टीकेचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संथ गतीनं बॅटिंग केल्यामुळे सोशल नेटवर्किंगवर धोनीला ट्रोल केलं जात आहे. धोनी जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा भारताचा स्कोअर १० ओव्हरमध्ये ८०/३ एवढा होता. पण धोनी मैदानात आल्यानंतर केएल राहुल काहीच वेळात आऊट झाला. यानंतर विकेटची पडझड सुरूच होती. ही पडझड सुरू असताना धोनी मैदानात टिकून राहिला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.


३७ वर्षांच्या एमएस धोनीनं ३७ बॉलमध्ये २९ रनची खेळी केली. या खेळीमध्ये धोनीनं एक सिक्स मारली, पण त्याला एकही फोर मारता आली नाही. या खेळीमध्ये धोनीनं ७८.३७ च्या स्ट्राईक रेटनं रन केले. याचबरोबर धोनी भारताकडून सगळ्यात कमी स्ट्राईक रेटनं खेळी करणारा (कमीतकमी ३५ बॉल) दुसरा खेळाडू ठरला. रवींद्र जडेजानं २००९ साली इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर ३५ बॉलमध्ये ७१.४२ च्या स्ट्राईक रेटनं २५ रन केले होते.



एमएस धोनीची ही ९७वी टेस्ट मॅच आहे. ८४ इनिंगमध्ये धोनीनं ३७.५४ च्या सरासरीनं १,५७७ रन केले आहेत. धोनीनं आपल्या टी-२० कारकिर्दीमध्ये फक्त दोन अर्धशतकं केली आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचा स्ट्राईक रेट १२५.२५ आहे.