बेंगळुरू : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात काल झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला २१ रन्सने मात दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे असले तरी टीम इंडियाने आधीच ही पाच वनडे सामन्यांची सीरिज ३-१ अशी खिशात घातली आहे. सामन्यानंतर या पराभवाबद्दल विराटने वक्तव्य केलं आहे. विराट कोहली याने मान्य केलंय की, बॅट्समन ऑस्ट्रेलिया विरूद्ध आणखी चांगलं प्रदर्शन करू शकले असते. पण आम्ही इतकेही वाईट खेळलो नाही.


विराट म्हणाला की, ‘आम्ही ३०व्या ओव्हरपर्यंत सामन्यात होतो. मला वाटले की, आम्ही त्यांना ३५० रन्सवर रोखू शकलो तर चांगले होईल आणि आम्ही तेच केलं. आमची सुरूवात चांगली होती. पण सलामी भागीदारीनंतर आणखी एका चांगल्या भागीदारीची गरज होती. आम्ही चांगली बॅटींग करू शकलो नाही. असं कधी कधी होतं. कधी कधी तो दिवस आपला नसतो. उमेश आणि शमीने चांगली बॉलिंग केली. ऑस्ट्रेलियाने आज खूप चांगले प्रदर्शन केले’.


तेच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सामना संपल्यावर व्यक्त केले की, ‘विजय मिळवल्यावर चांगलं वाटत आहे. डेव्हिड आणि फिंचने दमदार खेळ केला. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने खेळ पुढे नेला. मधल्या वेळात आम्ही नक्कीच काही विकेट गमावल्या, पण पीटर हँडकॉम्बने शेवटी चांगला खेळ करत आम्हाला ३३० पर्यंत पोहोचवले’.