ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला. रनच्या हिशोबानं भारताचा टी-२० क्रिकेटमधला हा सगळ्यात मोठा पराभव होता. या पराभवामुळे भारत ३ मॅचच्या टी-२० सीरिजमध्ये १-०नं पिछाडीवर पडला आहे. या सीरिजची दुसरी मॅच शुक्रवारी खेळवली जाईल. टी-२० सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही मॅच जिंकणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं ठेवलेल्या २२० रनचा पाठलाग करताना भारताचा १९व्या ओव्हरमध्ये १३९ रनवर ऑलआऊट झाला होता. या मॅचमध्ये भारताची बॅटिंग अपयशी ठरली होती. एमएस धोनीनं सर्वाधिक ३९ रन केले होते.


न्यूझीलंडच्या जमिनीवर टी-२० क्रिकेटमध्ये भारत अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत आहे. न्यूझीलंडमध्ये भारताला अजून एकदाही टी-२० मॅच जिंकता आलेली नाही. विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.


कुठे आणि कशी पाहाल मॅच?


भारत न्यूझीलंडमधली दुसरी टी-२० शुक्रवार ८ फेब्रुवारीला खेळवण्यात येईल


ही मॅच न्यूझीलंडच्या ऑकलंडमधील ईडन पार्कमध्ये खेळवली जाईल


सकाळी ११.३० वाजता मॅचला सुरुवात होईल


मॅचचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल


मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर पाहता येईल


भारतीय टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज


न्यूझीलंडची टीम


केन विलियमसन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, लॉकी फरग्युसन, स्कॉट के, कॉलीन मुन्रो, डॅरिल मिचेल, मिचेल सॅण्टनर, टीम सायफर्ट, ईश सोदी, टीम साऊदी, रॉस टेलर, ब्लेयर टिकनर, जेम्स निशम